झेप महिला औद्योगिक व उत्पादित सहकारी संस्था आणि पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तिनविराजवळ द्रोणागिरी इथे २१ डिसेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि खारेपाटातील संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे महोत्सवाच्या संयोजिका चित्रा पाटील यांनी सांगितले. त्या अलिबाग इथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अलिबागमधील महिला बचत गटांना एकत्र करून त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याचे काम झेप ही संस्था करत आली आहे. आता यापुढे जाऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २१ ते २५ डिसेंबरदरम्यान खारेपाट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. खारेपाटातील संस्कृती, परंपरा, कला आणि क्रीडा यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या अनुषंगाने केला जाणार असल्याचे महोत्सवाच्या संयोजिका चित्रा पाटील यांनी सांगितले.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी तब्बल १०० स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. महोत्सवात आदिवासी घटकाकडून उत्पादित मालासाठी आदिवासी बाजारचा समावेश असणार आहे. याबरोबरच आगरी कोळी फूड फेस्टिवल, लहान मुलांसाठी गेम झोन, कोकणातील लोकपरंपरेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. जास्तीतजास्त महिला उद्योजिका आणि बचत गटांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
तिनविरा येथे खारेपाट महोत्सवाचे आयोजन
झेप महिला औद्योगिक व उत्पादित सहकारी संस्था आणि पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तिनविराजवळ द्रोणागिरी इथे २१ डिसेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
First published on: 04-12-2012 at 05:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharepate carnival at tinvira