मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये अनधिृकत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर आजपासून ( ७ एप्रिल ) अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार अस्लम शेख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन मढकडे रवाना झाले आहेत. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारच्या काळात माफीयांचे राज्य होते. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेने २०२१ साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मढमध्ये उभारण्यात आले. पंचवीस आणि पन्नास हजार स्व्केअर फूटच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेने ‘आओ जाओ राज तुम्हारा’ असं चालवलं होते. फक्त ‘मातोश्री’वर हिशोब द्या आणि जे करायचे ते करा,” अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरे सुद्धा अश्रू ढाळत असतील…”, नवनीत राणांच्या या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; मनीषा कायंदे म्हणतात…

“आजपासून स्टुडिओ पाडण्याचं काम सुरु होणार असून, ‘मोदी है तो मुमकीन है’. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांनी मिळून स्टुडिओला परवानगी दिली होती. म्हणून अस्लम शेख काँग्रेसचा हात आणि वांद्र्याची नोट मोजण्याची मशीन यांची आघाडी होती,” असा हल्लाबोल किरीट सोमय्यांनी केला आहे.

हेही वाचा : “ठाकरे बघून गेल्यावर अर्ध्या तासात आनंद दिघेंचा मृत्यू”, शिंदे गटाच्या दाव्यावर केदार दिघे म्हणाले, “राज ठाकरे, एकनाथ शिंदे, राणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरीट सोमय्यांनी काय केला होता आरोप?

ऑगस्ट महिन्यात किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली. ज्यात १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटलं होते.