ईडीने मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. रजत कंजुमर आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरून ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काय बोलत नाहीत, असा हल्लाबोल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा : ईडीची छापेमारी मोठे षडयंत्र; ‘त्या’ चित्रफितीसह हसन मुश्रीफ यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, “आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझिया कर लावण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे दरवर्षी १५० कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आल्यावर कंत्राट रद्द करण्यात आलं. पण, याची संपूर्ण चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं आहे. हुंडा म्हणून हसन मुश्रीफांनी जावयाला प्रत्येक वर्षी १५० कोटी रुपये दिलं,” असा आरोप सोमय्यांनी लगावला.

हेही वाचा : पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार? ठाकरे गटाकडून खुली ऑफर

“मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झाला. तत्कालीन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड हे कमाईचं साधन होतं. संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रुग्णालय सर्व्हिसेसला १०० कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. तसेच, त्यांना रुग्णालयाच चालवण्याचा कोणाताच अनुभव नाही. मग, या कंपनीला १०० कोटी रुपयांचं कंत्राट कसं दिलं. या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक करोना रुग्णांचा मृत्यू झाला,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितलं.