नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय का घेतला याविषयी बोलताना सुभाष साबणे यांना रडू कोसळलं. त्यांना आता भाजपने पक्षप्रवेशाच्या आधीच देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध माजी शिवसैनिक अशीच लढत पाहायला मिळेल. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी विधानसभेत तोडफोड केल्याची आणि त्यासाठी वर्षभर निलंबित झाल्याची आठवण सांगितली. तसेच शिवसेना सोडण्याचं नेमकं कारण काय याविषयीही माहिती दिली. ते एबीपी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”

सुभाष साबणे म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. मात्र. नांदेडमधील बिलोली तालुक्यात काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांना बुटासह तुडवलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार घडला. मला वाईट वाटलं. म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले.”

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार

” अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नाही”

“मी आजही शिवसैनिक आहे. 4 ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं,” असं मत सुभाष साबणे यांनी व्यक्त केलं.

“आमचे मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांना पोलिसांकडून बुटांसह मारहाण”

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईवर सुभाष साबणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिवसेनेच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो. पण आज मुख्यमंत्री आमचे आहेत, तरी आमच्या कार्यकर्त्यांना बुटासह मारलं जातं. याचं वाईट वाटलं, खंत वाटली. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही. फक्त नांदेड जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या अशोक चव्हाण यांना आमचा विरोध आहे.”

काँग्रेस आमदार अंतापूरकरांचा कोविडनंतर मृत्यू झाल्यानं पोटनिवडणूक

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे शिवसेनेसह महाविकासआघाडीसाठी हा झटका मानला जातोय.

काँग्रेसकडून अंतापूरकरांच्या मुलाला, तर भाजपकडून माजी शिवसेना आमदाराला उमेदवारी

काँग्रेसने देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलालाच संधी दिलीय. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं”, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा!