Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेद्वारे कोट्यवधी महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सन्माननिधी जमा झाला आहे. रक्षाबंधनाच्या आधीच राज्य सरकारने राज्यातील बहिणींना हा निधी पोच केला. या योजनेअंतर्गत १७ तारखेला निधी पाठवण्यात येणार होता. परंतु, १४ तारखेपासूनच या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेक महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, दोन दिवस आधीच पैसे का पाठवले गेले? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला गेला. यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. एनडीटीव्ही मराठीने काही दिवसांपूर्वी त्यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

“पहिल्या टप्प्यात या योजनेमुळे एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला. पहिल्या टप्प्यामध्ये १ कोटी ३५ लाख महिलांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benifit Transfer-DBT) पाठवायचे होते. एवढ्या मोठ्या पद्धतीने DBT कोणत्याही विमानाने याआधी केलेलं नाही. याला साधारण एक प्रोसिजर असते. पहिल्या टप्प्यातील हा पहिला डीबीटा होता. चार दिवस सलग सुट्टीचे दिवस होते. आम्ही १७ तारखेला कार्यक्रम ठेवला. १९ तारखेला रक्षाबंधन होतं. सुरुवातीपासूनच ती गोष्ट नियोजित होती, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सन्माननिधी पोहोचवायचा होता”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ‘या’ राज्यांतही सुरू; थेट लाभ हस्तांतरणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम होणार?

त्या पुढे म्हणाल्या, “(Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्यामध्ये डीबीटी करू तेव्हा एक कोटी, दीड कोटी करू शकतो. आम्ही अनेक अकाऊंट्सवर ड्रायरन करत होतो, कारण इतक्या मोठ्या पद्धतीन डीबीटी करणार असतो तेव्हा अकाऊंट्सचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही एक रुपये भरून चाचणी करत होतो. या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९९ टक्के पात्र महिलांना आधीच पैसे मिळाले

“काही महिलांचं जुनं खातं असतं. ते वापरात नसल्याने आपोआप बंद होण्याची शक्यता असते. अशा बऱ्याचश्या बारीकसारीक गोष्टी असतात. त्यामुळे १४ तारखेला ३५-३० लाख डीबीटी करून पाहू. यामुळे किती सहजनतेने अकाऊंटमध्ये पोहोचत आहेत याचा फिडबॅक मिळेल, असं ठरलं गेलं. १७ तारखेला आयोजित केलेला कार्यक्रम पॉझिटिव्ह नोटवर करायचा होता. हा कार्यक्रम राज्यस्तरीय घेतोय तर ९९ टक्के लोकांपर्यंत डीबीटी पोहोचले पाहिजे, यासाठी दोन दिवस आधीपासूनच (Ladki Bahin Yojana) पैसे जमा करायला सुरुवात केली”, असंही ते म्हणाले.