कुटुंबाला अखेरचा निरोप देताना गावकरी हेलावले

लातूर-नांदेड रस्त्यावरील चापोली येथे मालमोटार व ऑटोरिक्षाची धडक होऊन सातजण मृत्युमुखी पडले. गुरुवारी सकाळी चापोलीत पाचजणांवर, तर अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथे दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लातूर-नांदेड रस्त्यावरील चापोली येथे मालमोटार व ऑटोरिक्षाची धडक होऊन सातजण मृत्युमुखी पडले. गुरुवारी सकाळी चापोलीत पाचजणांवर, तर अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथे दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील मृतांना अशा प्रकारे अखेरचा निरोप देताना गावकऱ्यांचे हृदय गलबलून गेले.
चाकूर तालुक्यातील चापोलीनजीक बुधवारी सकाळी रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला. जब्बार शेख, इकबाल शेख, मगदुम शेख, नजमुनबी शेख, खैरुनबी शेख यांचा दफनविधी चापोलीत, तर हसन पठाण व रिजवाना पठाण यांचा दफनविधी टेंभुर्णी येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. कुटुंबातील सातजणांच्या मृत्युमुळे होत्याचे नव्हते झाले. पत्नी, सासू, मुलगी, जावई व तीन तरुण मुले यांचा दफनविधी सुरू असताना नातलगांचे हृदय फाटून गेले होते. माजी आमदार बाबासाहेब पाटील, भाजपचे गोिवद केंद्रे, पंचायत समिती सभापती करीमसाहेब गुळवे, माजी जि. प. बांधकाम सभापती नारायण चाटे, डॉ. पुंडलिक चाटे, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद यांच्यासह विविध थरांतील मान्यवर, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Last right on sheikh family member

ताज्या बातम्या