कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी उद्या(रविवार)पासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे.

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची उभारणी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केली. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला होता. त्यातील काही जागेची विक्री अगोदरच झालेली आहे. तर उर्वरित जागेची विक्री दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. खरेदीदारात शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही माहिती समजल्यानंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

स्मारकाच्या मागणीला जोर –

जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणीही होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्टुडिओत लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. याशिवाय आणखीही काही संस्थांनी ही अशी मागणी केली आहे. तर, मला वाचवा…, असा आशय व्यक्त करून जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी कोल्हापूरकरांनी, कलाकारांनी एकजूट राखावी, असे संदेश सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत.

चित्रकर्मी एकवटले –

दरम्यान जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ उपलब्ध करावा, चित्रीकरण व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे या मागणीसाठी स्टुडिओच्या दारात बेमुदत उपोषण करणार असल्याचे, शनिवारी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जयप्रभा स्टुडिओचा ठेवा जपला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

राजकीय षडयंत्र –

“कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामीसाठी हे षडयंत्र रचले आहे. स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा. स्थापत्य अभियंता असलेला मुलगा ऋुतुराज याला खासगी जागा विकत घेण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. या खरेदीशी आपला संबंध नाही.”, असे शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.