लातूर – माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कव्हा रोड लातूर या संस्थेत आठ कोटी १८ लाख ८९ हजार ७०५ रुपयाचा अपहार झाला आहे. या प्रकरणी अध्यक्ष सचिव शाखाधिकारी व रोखपाल अशा चौघांविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहाराची रक्कम मोठी असल्याने हा गुन्हा लातूरच्या आर्थिक गुन्हे प्रगटीकरण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. लातूरच्या माहेश्वरी सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी शाखाधिकारी व रोखपाल यांच्या विरोधात पतसंस्था अध्यक्ष फुलचंद श्रीरंग पल्लोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षक डी टी गायकवाड यांनी लेखा अहवाल सुपूर्द केला. १८ कोटी १८ लाख ८ हजार ९७० रुपयांचा अपहार झाला आहे, असा अहवाल दिला आहे. आश्चर्य म्हणजे फिर्यादी यांनाच आता आरोपी करण्यात आले आहे. अध्यक्ष फुलचंद श्रीरंग पल्लोड, सचिव प्रेम किशोर मथुरा दास मुंदडा, शाखाधिकारी भीमाशंकर निळकंठ पाटील व रोखपाल सोमनाथ गोरख पंडित यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे.