लैंगिक छळप्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माने यांना दिलेली ही कोठडी केवळ बलात्काराच्या एकाच गुन्ह्य़ाबद्दल आहे. माने यांच्याविरुद्ध सहा महिलांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध सहा स्वतंत्र बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ांपैकी एका गुन्ह्य़ात त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य प्रत्येक गुन्ह्य़ात पोलीस त्यांना स्वतंत्ररीत्या अटक करणार असून त्यानुसार स्वतंत्र पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. दरम्यान या घटनेतील पोलिसांना हव्या असलेल्या मनीषा गुरव यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2013 रोजी प्रकाशित
लक्ष्मण माने यांना न्यायालयीन कोठडी
लैंगिक छळप्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माने यांना दिलेली ही कोठडी केवळ बलात्काराच्या एकाच गुन्ह्य़ाबद्दल आहे. माने यांच्याविरुद्ध सहा महिलांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे.
First published on: 16-04-2013 at 03:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman mane sent to 5 days judicial custody