शिकाऱ्याच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अवनीवरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं असतानाच हे नवीन प्रकरण समोर आले आहे. शिकाऱ्याने टाकेलेल्या फासक्याच्या तारेतून निसटता न आल्यामुळे भुकेने व्याकूळ होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आठ वर्षांचा पूर्ण वाढलेला हा नर बिबट्या होता. त्याची लांबी 200 सेंटीमीटर तर उंची 70 सेंटीमीटर इतकी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यात कामथे सुकाई मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे. येथे शिकाऱ्याने झाडाला बारीक तार बांधली होती. त्याच वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या या फासकीत अडकला. शरीराभोवती बसलेला तारेचा पिळ त्याला सोडवता आला नाही.

कामथे सुकाई मंदिराजवळ आज सकाळी ग्रामस्थाना बिबट्या मृत अवस्थेत दिसला. आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. तारेचा पिळ त्याच्या शरीराभोवती घट्ट बसला होता. त्यातच तो भूकेने व्याकूळ झाला होता. यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard dies after getting stuck in hunters trap in ratnagiri
First published on: 16-11-2018 at 17:56 IST