गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह खाणीच्या विरुद्ध  स्थानिक नागरिक आणि आदिवासींनी आंदोलन सुरू के ले आहे. शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास एटापल्ली येथे आंदोलन करणाऱ्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक के ली व इतर हजारो आंदोलकांना हुसकावून लावत मैदानही ताब्यात घेतले.

दरम्यान, अटक झालेल्या आंदोलकांची जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन सुरू झाले असून पोलीस आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप, आंदोलकांनी के ला आहे.

शुक्रवारी पहाटे पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनक नेत्यांना अटक के ली. त्यात प्रामुख्याने  जि.प. सदस्य सैनू गोटा, रामदास जराते, शिला गोटा, जयश्री वेळदा, मंगेश नरोटी यांचा समावेश होता. पोलीस आल्याने आंदोलनस्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

गुरुवारी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. मात्र तोडगा निघाला नव्हता.आंदोलक त्यांच्या भूमिके वर ठाम होते. तत्पूर्वी म्हणजे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदोलकांना निघून जा, अन्यथा पोलीस बळाचा वापर केला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी अटकेची कारवाई करण्यात आली.

सूरजागड खाण प्रकल्पाविरोधात  स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांनी २५ ऑक्टोबरला मोर्चा काढून खाण बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. खाण बंद होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त के ला होता.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकुण २५ लोहखाणी प्रस्तावित आहेत. यापैकी सूरजागड येथे खाण सुरू झाली. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक झाल्याने वातावरण तापले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आंदोलकांच्या अटके ला दुजोरा दिला.

पालकमंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने नाराजी आहे. विशेषत: शिंदे यांनी आंदोलकांची साधी दखलही घेतली नाही त्यामुळे संताप आहे

‘‘गडचिरोली जिल्ह्य़ातील लोहखनिज खाणींना विरोध करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू होते. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केलेली नाही. त्यासंदर्भात अधिक माहिती घेत आहे.’’

-विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री.