रवींद्र केसकर

धाराशिव : अठराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम राष्ट्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या टप्प्यात निवडणूक होणार आहे. १२ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होणार असून १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असेल. ७ मे रोजी मतदान तर २७ दिवसानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. २० लाख मतदार अठरावा खासदार ठरविण्यासाठी सज्ज असून आजपासून ५२ व्या दिवशी धाराशिव लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
land will be bought and sold as the state government has amended the Fragmentation Act Pune news
एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० लाख चार हजार २८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १० लाख ५८ हजार १५६ पुरुष, नऊ लक्ष ४६ हजार ४८नस्त्री तर ७८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा, लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्या मतदान केंद्रावर सर्व मतदान अधिकारी-कर्मचारी ह्या महिला असतील असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ मतदान केंद्र हे महिला अधिकारी कर्मचारी हे मतदान प्रक्रियेचे काम पाहतील. तर ज्या मतदान केंद्रावर पूर्णत: युवा अधिकारी-कर्मचारी काम पाहतील. त्यामध्ये सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अशा एकूण ६ मतदान केंद्राचा समावेश आहे. दिव्यांग अधिकारी कर्मचार्‍यांकडून १० मतदान केंद्र संचालीत केले जातील. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात ५, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा व बार्शी या विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १ केंद्र दिव्यांग अधिकारी-कर्मचार्‍यांकडून चालवले जातील. ८० वर्षांवरील जे मतदार व दिव्यांग मतदार मतदान केंद्रात जाऊन मतदान करु शकणार नाहीत. अशा मतदारापर्यंत मोबाईल मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान करता येईल. त्यासोबत मतदान निवडणूक चमू आवश्यक त्या सुरक्षेसह ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.

आणखी वाचा- सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा पोटनिवडणूक नाही

सहा विधानसभा मतदारसंघात दोन हजार १३९ मतदान केंद्र

लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा क्षेत्रात ३०७, उमरगा ३१५, तुळजापूर ४०६, धाराशिव ४१०, परंडा ३७२ आणि बार्शी ३२९ असे एकूण दोन हजार १३९ मतदान केंद्र राहणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी या सहा विधानसभा मतदारसंघात दोन हजार १३९ मतदान केंद्र राहणार आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये ७१ मॉडेल मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात १, उमरगा १७, तुळजापूर १७, धाराशिव १७, परंडा १७ आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात २ मतदान केंद्राचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रामध्ये १ औसा, १ उमरगा, २ तुळजापूर, २ धाराशिव, १ परांडा व १ बार्शी अशा एकूण ८ मतदान केंद्राचा समावेश आहे.

दहा हजार २६६ मतदान अधिकारी-कर्मचारी नियुक्त

औसा विधानसभा क्षेत्रात एक हजार ४७३, उमरगा विधानसभा क्षेत्रात एक हजार ५१२, तुळजापूर विधानसभा क्षेत्रात एक हजार ९४८, धाराशिव विधानसभा क्षेत्रात एक हजार ९६८, परंडा विधानसभा क्षेत्रात एक हजार ७८५ आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात एक हजार ५८० असे एकूण १० हजार २६६ मतदान निवडणूक अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे काम पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघासाठी भरारी पथके, तपासणी पथके व चित्रीकरण पथके निश्चित करण्यात आली आहे.

आणखी वाचा- दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, “तिकिट वाटपात महिलांना डावललं जातं आहे, ४०० पारचं..”

धाराशिवमध्ये तिसर्‍या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान

  • १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
  • १९ एप्रिल उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस
  • २२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस
  • मंगळवार, ७ मे रोजी मतदान
  • मतदानानंतर उमेदवारांचे देव २७ दिवस पाण्यात
  • मंगळवार, ४ जून रोजी मतमोजणी/निकाल
  • गुरुवार, ६ निवडणूक प्रक्रिया अंतिम केली जाणार