काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी गुरुवारी झालेल्या मतदानात लातूर जि. प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे सर्वाधिक ७६० मते घेऊन विजयी झाले.
एक हजार १५८ पात्र मतदार या निवडणुकीस पात्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. स्पध्रेत एकूण ७ उमेदवार होते. पकी मतदानाच्या वेळी सहाजण उपस्थित राहिले. यात जि. प. अध्यक्ष बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनीता आरळीकर, काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकत्रे जयवंत काथवटे, जि. प. समाजकल्याणचे सभापती बालाजी कांबळे व भारत स्काऊटचे माजी अध्यक्ष भा. ई. नागराळे यांचा समावेश होता. एकूण १ हजार १७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ मते अवैध ठरली. बनसोडे यांना सर्वाधिक ७६० मते पडली. त्या खालोखाल मोहन माने यांना ८०, जयवंत काथवटे ३३, नागराळे २८, बालाजी कांबळे १९, तर आरळीकर यांना १९ मते मिळाली. औरंगाबादचे रमाकांत जोगदंड यांना एकही मत मिळाले नाही. जिल्हय़ातील सर्व मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकल्याबद्दल बनसोडे यांनी सर्वाचे आभार मानले.
लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी या निवडीवर बोलताना, मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत बनसोडे यांच्या बाजूने बहुमत असल्याचे निकालातून दिसून आले. या प्रक्रियेमुळे पक्ष संघटना मजबूत होईल व आगामी निवडणुकीत पक्षाचे सर्व शिलेदार आपला उमेदवार बहुमताने निवडून आणतील, याची खात्री व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lottery of rahul formula to dattatray bansode
First published on: 14-03-2014 at 01:45 IST