मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन पुकारलं आहे. आज त्यांनी आंतरवली सराटी या गावात सभा घेतली. या सभेत सरकारला दिलेल्या मुदतीचे दहा दिवस राहिले आहेत जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर पुढची दिशा आम्हाला ठरवावी लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे. अशातच आता रासपचे नेते आणि महायुतीतले महत्त्वाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच एक महत्त्वाची मागणीही केली आहे.

काय म्हटलं आहे महादेव जानकर यांनी?

मराठा, धनगर आणि आदिवासी यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने आजवर खेळवत ठेवलं आहे. आता भाजपानेही असाच खेळ करत तसंच वागायला सुरुवात केली आहे. भाजपाने आरक्षणासाठी केंद्रात विधेयक मंजूर केलं पाहिजे. अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे. “धनगर आरक्षणच्या मुद्द्यावरुन महादेव जानकर यांनी नरहरी झिरवळ यांच्यावरही टीका केली. नरहरी झिरवळ हे संविधानिक पदावर आहे त्यांनी हे बोलणं शोभत नाही. लोकप्रतिनिधींनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे” असा सल्ला जानकर यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांना धमकी येणं हे चुकीचं आहे. अशा धमक्या देऊ नका. ते योग्य नाही. भुजबळ आमचे दैवत आहेत. भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशाराच जानकर यांनी दिला. अशा धमक्या देऊन काही होणार नाही. हे योग्य नाही. कायद्याने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहनही महादेव जानकर यांनी केलं.