अलीकडील काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर भाजपावर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच आता महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. भाजपा एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती, असा टोला महादेव जानकर यांनी फडणवीस यांना लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाबरोबर आल्याने फायदा होईल. पण, भाजपा एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती. भाजपावर टीका करण्याएवढा माझा पक्ष मोठा झाला नाही. भाजपा हा जगातील मोठा पक्ष आहे. माझा पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे,” असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आम्हीच जिंकू सांगणाऱ्यांचा अहंकार फार काळ टिकणार नाही, हे…”, संजय राऊतांनी व्यक्त केलं मत

“गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी भाजपाबरोबर गेलो होतो. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. पण, आताचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नाही. म्हणून आपण भाजपाच्या मागे लागण्यात अर्थ नाही,” असं महादेव जानकर यांनी म्हटलं.

“राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकसभेच्या ५४३ जागा लढणार आहोत. काही राज्यांत आमचा विजय होईल. मी स्वत: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी दिल्लीला जाणार,” असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “आम्हीच जिंकू सांगणाऱ्यांचा अहंकार फार काळ टिकणार नाही, हे…”, संजय राऊतांनी व्यक्त केलं मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंकजा मुंडे या भाजपाच्या सचिव आहेत. त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा एवढंच बहिणीला सांगेल. जास्त त्रास होऊ लागल्यावर बहिणीला साडी-चोळी देऊन आणण्यासाठी जाणार,” असेही महादेव जानकर म्हणाले.