महाजनादेश यात्रेच्या समारोपाला येणार नरेंद्र मोदी

महाजनादेश यात्रेचा समारोप कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडणार आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू आहे. महाजनादेश यात्रेच्या तिसरा टप्प्याच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. तिसरा टप्प्याची सुरूवात १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक असा महाजनादेश यात्रा असणार आहे. १९ सप्टेंबर रोजी महाजनादेश यात्रेचा समारोप कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडणार आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, नाशिकात होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. या एक दिवसीय दौर्‍यामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तीन शहरांना भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर महाजनादेश या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahajandesh yatra nashik pm narendra modi nck

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या