रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळील देवकुंड धबधबा येथे अडकलेल्या ५५ विद्यार्थ्यांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने देवकुंडजवळ रविवारी ५५ विद्यार्थी अडकले होते. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्स अॅपवर ट्रेकिंगची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार झाला होता. मुंबईतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी या ग्रुपमध्ये होते. या विद्यार्थ्यांनी भिरा गावातील देवकुंड धबधबा येथे पावसाळी सहलीचे आयोजन केले होते. सुमारे ५५ विद्यार्थी देवकुंड धबधब्यावर गेले होते. हे सर्व विद्यार्थी १७ ते २० वर्ष या वयोगटातील होते. रविवारी सकाळी हे सर्व जण देवकुंड धबधब्याला जाण्यासाठी मुंबईतून निघाले होते. देवकुंड धबधब्याच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे ५५ विद्यार्थी अडकून पडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 55 students trapped devkund waterfalls near raigad rescued by police kundalika river watch video
First published on: 26-06-2017 at 10:04 IST