नव्य राज्य सरकारची स्थापना होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा विस्तार रखडल्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्यात येत नव्हेत. मात्र, आता राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा- Maharashtra Cabinet Expansion: उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, १२ मंत्री घेणार शपथ? ही घ्या यादी

अधिवेशन काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रजा रद्द

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनदरम्यान रजेवर असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आला आहे. अधिवेशन सुरु असल्यामुळे या काळात विधिमंडळ सचिवालयांचे कार्यालय सुरु राहणार आहे. तसेच या कालावधीत सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती अनिर्वाय करण्यात आली आहे.

हेही वाचा- “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तरी…”, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद!

उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. महाराष्ट्रात नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अखेर उद्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.