राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सामान्य माणसाला सर्वाधिक उत्सुकता असते ती काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले हे जाणून घेण्याची. १ जुलैपासून २०१७ पासून देशभरात जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ काहीच वस्तूंची किंमत कमी किंवा अधिक केली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर निरनिराळ्या वस्तूसाठी किंमत ठरवली जाईल तोपर्यंत का होईना काही वस्तुंची किंमत कमी-अधिक झाली आहे.

सरकारने विदेशी आणि देशी मद्यावरील कर वाढवला आहे. त्यामुळे राज्यात मद्य महाग होणार आहे. मद्यावरील मूल्यवर्धित कर २३.०८ टक्क्यांवरुन २५.९३ टक्क्यांवर नेला आहे.

https://twitter.com/ANI_news/status/843050028105109504

ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी स्वाईप मशीनवरील कर काढण्यात आला आहे. त्यामुळे मशीन्स स्वस्त होणार आहेत. ऑनलाइन व्यवहारांना प्रेरणा देण्यासाठी हे करण्यात येणार आहे. राज्यामध्ये शेतीबरोबरच दुग्धविक्री हा व्यवसाय केला जातो. त्यानुसार, मिल्क टेस्टिंग किटवरील कर माफ करण्यात आला आहे. छोट्या शहरातील विमातळावरील कर कमी केला आहे.

शेततळ्यांकरता आवश्यक असलेल्या जिओमेम्ब्रेनवर कर माफी करण्यात आली आहे. ऊस खरेदी कर माफ करण्यात आला आहे. सॉईल टेस्टिंग किटही करमुक्त करण्यात आली आहे. विद्युतदाहिनी आणि गॅसदाहिनीचा करही मुक्त करण्यात आला असल्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.