मुंबई : राज्यातील गिर्यारोहण, सायकलिंग, प्रस्तरारोहण आदी साहसी पर्यटनाकरिता पर्यटकांच्या सुरक्षेकरिता तयार करण्यात आलेल्या साहसी पर्यटन धोरणास बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ, वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींना लागू नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांच्या सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. या प्रकारच्या पर्यटनाकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ, साधने यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर आवश्यक सर्व अहर्ता पूर्ण कराव्या लागतील. त्या मिळवल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet approves adventure tourism policy zws
First published on: 15-07-2021 at 01:27 IST