‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिले. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray in loksatta drushti ani kon scsg
First published on: 05-06-2021 at 16:58 IST