बुलढाणा जिल्ह्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर भरधाव कंटेनरने बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सुदैवाने पुलाच्या कडेला दगड होते आणि यातील एका दगडामुळे बस थांबली. यामुळे बस खाली कोसळली नाही आणि ५५ प्रवाशांचा जीव वाचला. सर्व प्रवाशांची बसमधून सुखरुप सुटका झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून नांदुरामार्गे बुलढाण्याकडे जात होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कंटेनर बसला धडक देऊन पुलावरून नदी पात्रात कोसळला. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कंटेनर नदी पात्रातील गाळात फसला असून, त्यात आणखी काही जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra container collision with st bus driver killed 55 passengers unhurt
First published on: 07-12-2017 at 19:00 IST