महाराष्ट्रात सोमवारी नव्याने ३१ हजार १११ करोना रूग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७२ लाख ४२ हजार ९२१ इतकी झाली आहे. मागील २४ तासात राज्यात २४ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह एकूण करोना मृत्यूंची संख्या १ लाख ४१ हजार ८३२ इतकी झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे. दुसरीकडे राज्यात आज २९ हजार ९२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ६८ लाख २९ हजार ९९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३ टक्के एवढा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारपर्यंत राज्यात एकूण ७ कोटी २१ लाख २४ हजार ८२४ नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२ लाख ४२ हजार ९२१ (१०.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या एकूण २ लाख ६४ हजार ४४१ सक्रीय करोना रुग्ण आहेत. राज्यात सद्यस्थितीत २२ लाख ६४ हजार २१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सोमवारी राज्यात १२२ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत.

राज्यात कोठे किती ओमायक्रॉन बाधित रूग्ण?

पुणे–४०

मीरा भाईंदर- २९

नागपूर-२६

औरंगाबाद- १४

अमरावती-७

मुंबई- ३

भंडारा, ठाणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, रविवारी देशात अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात करोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत दैनंदिन प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra corona covid 19 omicron infection patient updates 17 january 2022 abn
First published on: 17-01-2022 at 21:39 IST