लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात. पण आपल्याकडे आता केंद्रीय कृषीमंत्री पद नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपणास पाच वर्षे सुटीवर पाठविले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. शनिवारी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रातील नव्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. परंतु, निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून त्यास राष्ट्रवादी विरोध करेल, असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मला सुटीवर पाठविले’
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात.

First published on: 20-07-2014 at 04:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra farmers send us on vacation sharad pawar