शेतकरी संपाचे केंद्र पुणतांबे (ता. राहाता) हे असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राम शिंदे तसेच पक्षाच्या आमदारांची मध्यस्थीसाठी मदत घेतली नाही. त्यांना डावलण्यात तर आलेच, पण आता संपात विरोधक लक्ष्य करीत असल्याने त्यांची राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.
पालकमंत्री राम शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात. राज्यमंत्री मंडळात त्यांना बढती देण्यात आली. नुकतेच इतर मागासवर्गीय विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. सध्या जिल्ह्यात राजकीय भूमिका घेण्यात त्यांचा पुढाकार असतो. जिल्हापरिषद व नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली होती. पण पुणतांबे येथे शेतकरी संप सुरु झाल्यानंतर त्यांना दूर ठेवण्यात आले.
संप सुरु होण्यापूर्वी किसान क्रांतीचे संयोजक असलेल्या डॉ. धनंजय धनवटे यांच्या गटाबरोबर मुख्यमंत्र्यांनी बोलणी केली. त्यांनी संप मागे घेतला. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे उपस्थित होते. मात्र शिंदे यांना या वेळी डावलण्यात आले. त्यानंतर संपात मध्यस्थी करण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पुणतांब्याला आले. त्यानंतर संयोजक चच्रेसाठी राजी झाले. मात्र संप मागे घेण्यात आला नाही. या वेळी आमदार स्न्ोहलता कोल्हे या उपस्थित असल्या तरी मंत्री शिंदे व अन्य आमदारांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते.
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे स्न्ोहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी कíडले हे आमदार असून खासदार दिलीप गांधी व माजी मंत्री बबनराव पाचपुते हे पक्षाचे नेते आहेत. त्यांना व जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले. कíडले व पाचपुते यांना नगरच्या राजकारणाची नाडी माहीत आहे. जिल्हापरिषद व नगरपालिका, महापालिका व जिल्हाबँक निवडणुकीत त्यांनी अनेकदा राजकीय यश मिळविले आहे. कíडले हे तर राजकीय डावपेचात तज्ज्ञ मानले जातात. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनाही त्यांनी अनेकदा राजकीय शह दिला आहे.
शेतकरी संपाला नगर जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद मिळत असून भाजपाच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली जात आहे. पण लोकांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून त्यांनी मौन बाळगले आहे. राजकारणासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देत नसल्याबद्दल त्यांचे राजकीय विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली असून लोकप्रतिनिधी कुठे गायब आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. आंदोलनाला पाठिंबा दिला तर पक्षाकडून कारवाई होण्याची भीती व मुख्यमंत्री नाराज. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा रोष व विरोधकांची टीका अशा कात्रीत ते सापडले आहेत. ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील स्मशानभूमीत शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले होते. उपोषणार्थीनी आमदार कíडले यांच्यावर जोरदार टीका केली होती. अखेर कíडले यांनी उपोषणार्थीची समजूत काढून त्यांना उपोषण मागे घेण्यास राजी केले. एकूणच जिल्ह्यातील मंत्री िशदे व लोकप्रतिनिधींना, मंत्री खोत हे मुंबईतून येऊन संपात मध्यस्थी करतात, तर तुम्ही का मध्यस्थी केली नाही, असा प्रश्न विचारला जातो आहे.