चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यानंतर करोनाची नवीन लाट आली असून या लाटेमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीएफ-७ चे आहेत. त्यामुळेच भारतामध्येही या सब व्हेरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि ओदिशामध्ये प्रत्येकी दोन ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट बीएफ-७ ने बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून आढावा बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र याच करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बुधवारी नागपूरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत या व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही. पत्रकारांसमोरच तानाजी सावंतांना ‘ओमिक्रॉन’ या शब्दाची आठवण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना करुन द्यावी लागली.

‘ओमिक्रॉन’ऐवजी म्हणाले…

तानाजी सावंत यांना चीनमध्ये थैमान घालणाऱ्या बीएफ-७ च्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस उत्तर देताना सावंत यांनी ओमायक्रॉनचा उल्लेख ‘एमिक्रॉन’ असा केला. त्यानंतर आपला उच्चर चुकल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना या व्हेरिएंटचं नेमकं नाव काय आहे हे नजर आणि देहबोलीमधूनच विचारलं. त्यावर सहकाऱ्यांनी ‘ओमिक्रॉन… ओमिक्रॉन…’ असं म्हणत मदत केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना या व्हेरिएंटचं बरोबर नाव घेता आलं.सावंतांनी ओमिक्रॉनच्या ऐवजी ‘एमिक्रॉन’ असा उच्चार केला अन् स्वत:च थांबून अधिकाऱ्यांना नेमका शब्द विचारला.

If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

नक्की पाहा >> Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

…अन् डोक खाजवत दिली प्रतिक्रिया

नव्याने संसर्ग वाढतोय त्यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. त्यावर सावंत हे, “घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपला जो एमिक्रॉन…” असं वाक्य अर्ध्यात तोडत थांबले. त्यानंतर सावंतांनी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांकडून करोनाच्या या व्हेरिएंटला नेमकं काय म्हणतात हे प्रश्नार्थक देहबोलीमधून विचारलं. त्यावर मागून एक-दोन जणांनी ‘ओमिक्रॉन’ असं म्हटलं. हे ऐकल्यानंतर तानाजी सावंतांनी आपलं डोक खाजवतच पुढील प्रतिक्रिया नोंदवली. “ओमिक्रान… ज्या पद्धतीचा डायल्यूट होता. त्याचपद्धतीचा किंवा त्यापेक्षा आणखीन डायल्यूट हा आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं माझ्या डिपार्टमेंटकडून निवेदित करण्यात आलं आहे,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> विश्लेषण: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF-7 Variant चे भारतात ४ रुग्ण; संसर्गाची लक्षणं कोणती? लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, कारण…

केंद्राने दखल घेत सूचना केल्या

चीनबरोबरच जगभारतील देशांमध्ये वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने सतर्क राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी नागपूरमधून करोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “चीनमध्ये किंवा भारताबाहेर जे चित्र दिसत आहे, प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केलं आहे ते पाहून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यांनाही सांगितलं आहे की तुम्ही याबद्दल सतर्क राहा,” असं तानाजी सावंत म्हणाले.

घाबरण्याची गरज नाही

त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणाचा संदर्भ देत चीनमधील करोना प्रादुर्भावाने आपण घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. “या वेळेस घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. कारण कोव्हीडचा डोस एक, डोस दोन आणि ६०-६५ वर्षांवरील लोकांना बुस्टर डोस आपण दिलेला आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं अजिबातच कारण नाही. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा, आरोग्य सुवधा आणि करोनासंदर्भातील टीम सर्वजण तयारीमध्ये आहेत. त्याचाच एक आढावा घेणारी बैठक घेतली आहे. दोन दिवसांमध्ये आमच्याशी कम्युनिकेट करा आम्ही सुविधा पुरवू असं सर्वांना आम्ही कळवलं आहे,” असं सावंत म्हणाले.

नक्की वाचा >> चीनमधील करोना उद्रेकानंतर महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती? आरोग्यमंत्र्यांचं सूचक विधान; म्हणाले, “हे आम्ही…”

तयारी पूर्ण

“माझ्या डिपार्टमेंटला अगदी रुट लेव्हलपासून म्हणजे पीएचसीपासून (प्रायमरी हेल्थ सेंटर) आपल्या तालुक्याच्या जागा असतील किंवा जिल्हास्तरावर असेल. मेगा सिटी असतील, मोठी शहरं असतील, महानगरपालिकेतील विभाग असतील सर्वांना हीच गोष्ट पुन्हा सांगितली की टेस्टींग, ट्रॅकींग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन या चार स्टेप आहेत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी. ९५ टक्क्यांहून अधिक जणांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशापद्धतीच्या काही बातम्या आल्या तर घाबरुन जाण्याचं अजिबात कारण नाही. प्रशासन, शासन सतर्क आहे निर्णय घेण्यासाठी आपली यंत्रणा पूर्ण तयारीत आहे,” असं सावंत म्हणाले.