MSBSHSE Maharashtra Board Class 12th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे.
आज दुपारी १ पासून निकाल पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. बोर्डाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आली. आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
या लिंकवर क्लिक करा आणि पाहा निकाल
विभागनिहाय निकाल २०२५
कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
बारावीच्या निकालातही मुलींची बाजी
निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. नोंदणी केलेल्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांपैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १ लाख ४९ हजार ९३२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९७.३५ टक्के, कला शाखेचा ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८३.२६ टक्के, आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला.