Maharashtra HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.
असा पहा निकाल
http://www.mahresult.nic.in
http://www.result.mkcl.org
http://www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
hscresult.mkcl.org
या संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी MHHSC बैठक क्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.