scorecardresearch

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू

९ ते २३ डिसेंबर दरम्यान कोल्हापुरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तापला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषीक देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- कन्नडिगांकडून पुन्हा ट्रकला फासलं काळं : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “घाबरटांनी शिवसेना…”

याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा होत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू करण्यात आला अहड. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 23:14 IST

संबंधित बातम्या