Maharashtra Rain Update : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. रायगड येथील इर्शाळवाडीवर कोसळलेली दरड, राष्ट्रवादीच्या आमदारांना निधीवाटप, राज्यभर ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती या सर्व मुद्द्यांवरून आज दोन्ही सभागृह गाजण्याची शक्यता आहे.
Mumbai Maharashtra Live News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
"मुख्यमंत्री बदलणार असल्याचे संकेत देणं आणि कन्फ्युजन निर्माण करणे बंद केलं पाहिजे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मनात संभ्रम होता. महायुतीच्या नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम ठेवण्यात कारण नाही. पृथ्वीराज चव्हाण जे बोलले असं वक्तव्य अनेकजण करत आहेत. मुख्यमंत्री ठरवतील त्या तारखेला आमचा विस्तार होणार आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत", यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोर दिला.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू, गरिबांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयत. पण ही संधी आपल्याला आली आहे. आपण भरोसा कायम केला पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांना, गरिबांना ज्यांचं नुकसान झालं त्यांची भरीव मदत करताहेत. पण मागच्या वर्षीच्याही पुरवणी मागण्या मान्य झालेल्या नाहीत - नाना पटोले, काँग्रेस
मागच्या वेळीसुद्धा अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती. तेव्हा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हा सर्वेक्षणही झालं. संपूर्ण अहवाल मंत्रालयात आल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. तीस ते चाळीस टक्के लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी- अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका गुरूजींची बदली झाली, अन् शाळेतील पोरं-पोरी तर धाय मोकलून रडलीच, पण शाळेची गळती थांबविण्यासाठी पोरांना भाकरी करायला शिकवणारे गुरूजी जातात म्हटल्यावर निरोप द्यायला सारा गाव जमला. पोरा-पोरींनी तर गुरूजींच्यावर उधळलेली फुले म्हणजे अश्रूंची फुलेच झाली.
वाशिम: एकीकडे खासगी शाळांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद शाळा अखेरची घटका मोजत आहेत. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेत खोल्याच नसल्याने गावातील संस्थान मध्ये शाळा भरते.
नागपूर : दहशतवादी अफसर पाशा सौदी अरेबियात असताना त्याचा रुममेट म्हणून पाकिस्तान, बांगलादेशातील दोन तरुण होते. त्यापैकी पाकिस्तानी युवक हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तसेच बेंगळुरूतील टाटा इन्स्टिट्यूट येथील बॉम्बस्फोटात सहभागी असलेला अब्दूल रहेमान हादेखील पाशासोबत सौदी अरेबियात होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पाशा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध घटना आणि त्यादरम्यानच समोर येणारी सायबर क्राईमची प्रकरणे पाहता ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट अशा माध्यमांमध्ये सतर्क राहण्याचीच गरज आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच प्राथमिक स्तरावर तोडगा न निघाल्यास तातडीने संबंधित यंत्रणांकडे याची नोंद करणे महत्त्वाचे आहे.
नागपूर : घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला ओळखीच्या आरोपीने घराच्या छतावर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून त्याला अटक केली आहे. मनीष श्याम डहरीया (२५) रा. यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
माजी महापौर दशरथ पाटील यांचे फेसबुक खाते हॅक करण्यात आले आहे. खोडसाळपणा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याबाबत सायबर गुन्हे शाखेला पत्र देण्यात आले आहे.
मागील काही महिन्यांपासून बंद असलेली पडघा-खडवली रेल्वे स्थानक बस सेवा सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली. गेल्या आठवड्यात खडवली फाटा येथे झालेल्या अपघातात सहा प्रवाशांची मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रवाशांनी पडघा-खडवली बस सेवा सुरू करण्याची मागणी सुरू केली होती.
अकोला : जिल्ह्यात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला. पावसामुळे ३१३ घरांची पडझड झाली. मदत व बचावकार्य पथकाकडून करण्यात येत आहे. रविवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली.
अजित पवारांची विधान परिषदेत घोषणा
नागपूर : राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत.
कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आणि चौक आहे. या चौकामध्ये शासनाने उड्डाण पूल मंजूर केला आहे. या पुलाला अडथळा ठरणारी अतिक्रमणे राजकीय हेव्यादाव्यामुळे हटविली जात असल्याने या पुलाच्या उभारणीत अडथळा आला आहे.
काही संकेतस्थळांवरून सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात लिखाण झालेले आहे. अशा संबंधित संकेतस्थळांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आज विधआन परिषदेत केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्वाही दिली. ते म्हणाले की, अशा व्यासपीठांना ब्लॅकलिस्ट करण्याची पद्धत नाही. उच्च न्यायालया, सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयांनुसार याबाबतचे नियम तयार होत आहेत. परंतु, सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात लेखण झालं असेल तर त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
मालवाहू वाहनातून ७०० किलो गोवंश जनावराचे मांस वाहून नेण्यात येत असताना ओझर पोलिसांनी वाहन अडवून चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ओझर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना शुक्रवारी रात्री ११ वाजता मालेगांवहून मुंबईकडे मालवाहू वाहनातून गोवंश जनावरांचे मांस नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
वर्धा : हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय, समुद्रपूर व सेलू ग्रामीण रुग्णालय तसेच गिरड आरोग्य केंद्रात चार रुग्णांना उपचार नाकारण्यात आले. अखेर सेवाग्राम रुग्णालयाच्या वाटेवर असताना चौघेही दगावले. सीमा किशोर मेश्राम, बोधेश्र्वर वागदे, अश्विनी उमेश कापसे, सुशीला पांधरे अशी मृतांची नावे आहेत.
जळगाव: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून, महसूल विभागाच्या पथकांवर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
उरण : हवामान विभागाने समुद्रात खराब हवामान व अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. त्यासाठी जलवाहतुकीला इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. त्यामुळे उरणमधील जलसेवा मागील सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना बसला आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत प्रवेश पात्रता गुण हे ९५ टक्क्यांच्या पार पोहोचले होते. त्यामुळे पहिल्या विशेष प्रवेश यादीत प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट होण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. पहिल्या विशेष प्रवेश यादीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये तब्बल ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कोल्हापूरकडे लक्ष पुरवले आहे. ते सोमवारी दिवसभर जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पूरस्थितीची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. १७ जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. २० जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरडीएक्स या स्फोटकांनी भरलेला टॅंकर मुंबईवरून गोव्याला जात असून त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
यवतमाळ : अधिक मासाचे महत्त्व म्हणून मुलगी आणि जावायला सासरच्या लोकांनी पाहूणचारासाठी बोलावले. धोंड्याचा महिना जोरात साजरा झाला. माहेरचा पाहूणचार घेऊन सासरकडे जाताना विवाहिता पैनगंगा नदीच्या पुरात पडली व वाहून गेली. अद्याप तिचा शोध लागला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी बंगलोर येथे निधन झाले. मदनदास देवी यांचं पार्थिव उद्या सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील मोती बाग येथील संघाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरीक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून पासून पुढील ७२ तास अन्नत्याग आंदोलनाला इचलकरंजी येथे सुरुवात केली. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला.
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र पॉलिटिक्स लाइव्ह
Mumbai Maharashtra Live News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा