Marathi News Updates, 25 June 2025: केंद्राचे त्रिभाषा सूत्र राबविण्यावरून राज्य सरकारवर आता सर्वच क्षेत्रामधून टीका होऊ लागली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनीही आता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शिकवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. सर्व स्तरातून विरोध होऊ लागल्यानंतर सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे म्हटले आहे. या विषयावर आजही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. निधी वाटपात अन्याय होत असल्याची तक्रार सरकारमधील काही आमदारांनी केला आहे. यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर खात्यावर ‘वॉच’ ठेवला जाणार असल्याची चर्चा समोर आली. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्या खात्यावर ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा असेल त्यांनी तो ठेवावा. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसभरातील सर्व राजकीय घडामोडींवरील अपडेट्स या ब्लॉगमध्ये जाणून घ्या…
पंढरपूर यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून जादा बससेवा
Maharashtra Breaking News Live Updates: अशोक स्तंभाऐवजी राज्य सरकारकडून ‘सेंगोल’चा वापर; विरोधकांकडून टीका
आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'संविधान हत्या दिवस २०२५' चे आयोजन आज राजभवनात करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जाहीरात महाराष्ट्र डीजीपीआयआरच्या अधिकृत एक्स खात्यावर टाकली असून त्यात अशोक स्तंभाऐवजी सेंगोलचा फोटो वापरण्यात आला आहे. तसेच आज प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडत असताना त्यामागेही सेंगोलचाच फोटो होता. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा केला विनयभंग, फरासखाना पोलीसमध्ये गुन्हा दाखल
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलची निर्णायक आघाडी, ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’चे प्रमुख रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का
Maharashtra Breaking News Live Updates: मनसे आणि शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद, कोणता निर्णय होणार?
शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई हे आज एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दोन्ही सेनेचे नेते पहिल्यांदाच पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. कामगारांच्या प्रश्नासाठी ही पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यानिमित्ताने युतीसंदर्भात काही भाष्य केले जाणार का? याची उत्सुकता आहे.
वाघ वाढले, पण वाघाच्या भक्ष्यांचे काय? काय म्हणतो भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल?
हिंदी सक्तीविरोधात धुळ्यात ठाकरे गट, मनसे यांचे आंदोलन
मोठ्या उद्यानांमधून नाशिक महानगरपालिकेची पुन्हा अर्थार्जनाची तयारी
Maharashtra Breaking News Live Updates: 'मशिदीत जाऊ नका', उपमुख्यमंत्री अजित पवारांची किरीट सोमय्या यांना सूचना
भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यास सुरुवात केली आहे. मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन यासंबंधीचे पत्र दिले. यानंतर अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना मशिदीत न जाण्याचा सूचना दिल्या. किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून ही सूचना देण्यात आली असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे.
Maharashtra Breaking News Live Updates: चांदीच्या ताटात जेवणावळीवर संजय राऊत यांची टीका
मुंबईत झालेल्या देशभरातील संसद व राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी जेवणावळीच्या कार्यक्रमात चांदीची ताटं वापरल्या आरोप होत आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्र अंदाज समितीच्या बैठकीवर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. धुळ्यातील गेस्ट हाऊसमध्ये रोकड सापडल्याचे प्रकरण ताजे होते. त्यातच मुंबईत चांदीच्या ताटात जेवणावळी झाल्या. नशीब त्यांनी सोन्याचा चमचा वापरला नाही. भ्रष्ट अंदाज समितीचा अध्यक्ष कालच्या परिषदेत ज्या पद्धतीने मिरवत होता, हा राज्याला लागलेला कलंक आहे, अशी टीका त्यांनी केली.