Mumbai News Today : एका सर्वेक्षण अहवालानुसार, राज्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या जाहिरातीमधल्या दाव्यांनुसार राज्यात भाजपाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने दिला कौल दिला आहे. याचाच अर्थ भाजपा आगामी निवडणूक शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकू शकत नाही असा संदेश शिंदे गटाला या जाहिरातीमधून द्यायचा असल्याचं बोललं जात आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर प्रहार केले आहेत. या अहवालाची जाहिरात प्रसिद्ध करताना त्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आनंदाच्या क्षणी बाळासाहेबांना विसरलात का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. यासह राज्यातील अनेक घडामोडी येथे वाचता येतील.
Maharashtra Live News Today
यवतमाळ: मानसिक स्थिती बिघडल्याच्या अवस्थेत घर सोडलेली महिला तब्बल २० वर्षे देशात भटकत राहिली. या काळात तिचा मृत्यू झाला असे समजून तिच्या कुटुंबियांनी सर्व विधी उरकून घेत तिचा फोटोही घरात भिंतीवर टांगला.
ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी लागू केलेल्या पाणी कपातीमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई: ‘मला पुन्हा एकदा चित्रपटातून विनोदी भूमिका साकारायच्या आहेत, मात्र माझ्या वयाच्या अनुषंगाने उत्तम विनोदी कथा लिहिणारे लेखकच नाहीत’, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या तपासात १५ वर्षीय मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सतत ओरडत व रागवत असल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच यमसदनी पाठवले.
वर्धा : सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्पा म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसाठी या परीक्षेतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार सीईटी सेलकडून बावीस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांना खरमरीत पत्र पाठविले आहे. त्यात तुम्ही मुंब्य्राचे वाटोळे करीत आसल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी दोन्ही आयुक्तांवर केल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावती: एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ओळखीच्या तरूणासोबत गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर आरोपी तरूणाने परतीच्या प्रवासादरम्यान एका शेतात तिच्या डोळ्यावर दुपट्टा बांधून अतिप्रसंग केल्याची घटना मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे.
वर्धा : सध्या बियाणे खरेदीचा बाजार जोरात आहे. खरीप हंगामाची लगबग म्हणून शेतकरी बंधू बियाण्यांसाठी धावपळ करीत असल्याचे बाजारातील चित्र आहे. मात्र खरेदीत कबड्डी व पंगा या दोन कापूस वाणांची जोरात चर्चा आहे. कारण बहुतांश याच वाणांचा आग्रह धरीत आहे.
अमरावती: काँग्रेसने राज्यातील शिक्षकांची एकजूट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील शिक्षकांचे सर्व स्तरावरील प्रलंबित प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक-पदवीधर आमदारांची एक समिती गठीत करण्यात आली आहे.
वाशीम : एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. कमी पट संख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे. परंतु शिक्षकाची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्व. अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्जेदार झाली. येथे ८५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, जवळपास ५०० विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. ही नक्कीच प्रेरणादायी बाब आहे.
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे: बिपरजॉय या अतितीव्र चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र या चक्रीवादळात नुकसानकारक क्षमता आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांना धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला.
नागपूर: अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ १२५ ते १३५ किलोमीटर प्रती तास वेगाने गुजरात ते पाकिस्तान दरम्यानच्या किनारपट्टीवर १५ जूनला धडकण्याची शक्यता आहे.
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी एकमुखी मागणी विविध संघटनांनी केली. दुसरीकडे बजरंगदलाने आरोपी हा संघटनेचा सदस्य नसल्याचा दावा केला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
नागपूर : विविध बँकांचे कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील वनामती संस्थेत आयोजित रोजगार मेळाव्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त ५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
नागपूर: अफगाणीस्तानात जीवाला धोका असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात राहणाऱ्या एका अफगाणिस्तानच्या नागरिकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याची गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरु आहे.
यवतमाळ : मानसिक स्थिती बिघडल्याच्या अवस्थेत घर सोडलेली महिला तब्बल २० वर्षे देशात भटकत राहिली. या काळात तिचा मृत्यू झाला असे समजून तिच्या कुटुंबियांनी सर्व विधी उरकून घेत तिचा फोटोही घरात भिंतीवर टांगला. मात्र गेल्या आठवड्यात ‘ती’ अचानक तिच्या पश्चिम बंगालमधील घरी पोहोचली आणि कुटुंबियांसह नातेवाईकसुद्धा अवाक झाले. यवतमाळ येथील ‘नंददीप’ फाउंडेशनच्या माध्यमातून ही किमया घडली होती.
शासन आपल्या दारी या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० वर एसटी बसेस राखून ठेवल्या असल्याने जिल्ह्यातील प्रवासी वर्गांची दैना उडाली आहे. 'शासन आपल्या दारी प्रवासी वाऱ्यावरी ' अशी अवस्था झाली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवलीत पालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वीची गटार सफाईची कामे करताना कामगारांना जीव सुरक्षेची कोणतेही साधने ठेकेदाराकडून देण्यात येत नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालून कामगारांना गटार सफाई करावी लागत आहे. याविषयी कामगार खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. सविस्तर वाचा
शिक्षकांना अनेक अनावश्यक कामासाठी जुंपले जाते. त्याचा थेट परिणाम विद्यादानावर होतो. त्यामुळे शिक्षकांना या अशा अनावश्यक कामांसाठी वेठीस धरू नका, अशी सूचना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षणाधिकार्यांना केली.
लोणावळा: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन टँकर रस्त्यामध्ये पलटी झाला व टँकरला भीषण आग लागल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट उसळले आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ घडली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात नियुक्तीचे आदेश नसताना सुनील पाटील नावाचा एक उपअभियंता मागील चार वर्षापासून नगररचना विभागात ठाण मांडून आहे. या अधिकाऱ्याकडे विशेष प्रकल्पाचा पदभार असताना त्याकडे दुर्लक्ष करुन हा अभियंता नगररचना विभागात इमारत बांधकामाच्या नस्ती मंजुरीत महत्वाची भूमिका बजावत आहे.
यवतमाळ : इन्स्टाग्रामवर बहरलेल्या प्रेमाची फलश्रुती प्रेयसीचे अश्लील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात झाली. या प्रकरणी चाकण (पुणे) येथील तरुणाविरुद्ध नेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
"सर्व्हे काय सांगतात मला माहीत नाही. पण महाराष्ट्रातील भागाभागत फिरणारा मी आहे. कोणताहीसर्व्हे फेल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या २०० जागा आल्याशिवाय राहणार आहे. विकास नाही, शेतकरी बाजूने नाही. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. अस्थितरता आहे. महाराष्ट्र पहिल्यांदाचच इतका अस्थिर दिसतोय. त्यामुळे जे सर्व्हे रिपोर्ट आम्ही केलेत त्यानुसार महाविकास आघाडीला २०० जागा मिळतील. फडणवीस आणि शिंदेमध्ये काय सुरू आहे ते अख्ख्या जगाला माहितेय याबाबत मी अजून काय सांगणार. मला काय करायचं त्या दोघांमध्ये", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई: गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील भंगाराची विक्री करून ४५.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कार्यशाळा, आगारे, कारखाने, रेल्वे परिसरातील निरुपयोगी रूळ, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, रुळाचे साहित्य, चाके, पोलादी खांब व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली आहे.
बुलढाणा: नेमणुकीला शिक्षण विभागाची मान्यता मिळवून देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना एका वरिष्ठ लिपिकास मलकापूर बस स्थानक परिसरात रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
आगामी विधान निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येणार असल्यामुळेच दंगलीचे प्रकार घडत आहेत, असा दावाही त्यांनी केला. सविस्तर वाचा
मुंबई: मुंबईकरांना घराजवळच वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’ची संख्या वर्षअखेरपर्यंत २५० पर्यंत वाढविण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेने केला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेने १५९ ‘आपला दवाखाने’ सुरू केले असून, या दवाखानांमध्ये आतापर्यंत १० लाख नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.
भंडारा: ‘‘तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप डीपी बदला, आपल्या दोघांचा फोटो काढून तुमचा एकट्याचा फोटो ठेवा”, असे ‘ति’ने सायंकाळी फोन करून नवऱ्याला सांगितले. त्यांच्यातील हे संभाषण शेवटचे ठरले. फोन ठेवल्यानंतर ‘ति’ने भंडारा रोड रेल्वेस्थानक गाठले.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट
Maharashtra Live News Today