Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली असून याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय होणार का? याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. यासह जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची देखील राज्यभर जोरदार बॅटिंग चालू आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : राज्यासह देशभरातील सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
एक अर्ज करा आणि पोस्टात नोकरी मिळवा! परीक्षाही होणार नाही...
एका प्रेमकथेच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा हटके टीझर प्रदर्शित
वैजापूरच्या शेतकऱ्याला नाशिकमध्ये टोळक्याची मारहाण
नेमोलिन मायोपेथी: दुर्मीळ पण गंभीर स्नायू विकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण!
विधीमंडळात आमदारांना धक्काबुक्की? वरुण सरदेसाई म्हणाले, "नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकाने दोन वेळा…"
शिवसेना (शिंदे) नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्यामुळे शिवसेना (ठाकरे)आमदार वरुण सरदेसाई संतापल्याचं पाहायला मिळालं. "विधीमंडळात दहशतवादी घुसलेत का?" अशा शब्दांत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "मी नम्रपणे सांगतेय, तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती?" यावर सरदेसाई म्हणाले, "मला दुसऱ्यांदा धक्का लागला. असे कसे सारखे सारखे धक्के लागतात?"
होमिओपॅथी डॉक्टरांविरोधात आता ‘मार्ड’ही आंदोलनाच्या पवित्र्यात...
मुंढेगाव चित्रनगरीविषयी अधिवेशनानंतर बैठक; आशिष शेलार यांचे अजित पवार गटाला आश्वासन
Sanjay Gaikwad Video: "महाराष्ट्रात साऊथ इंडियाच्या लोकांनी…", कॅन्टिनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाणीबाबत संजय गायकवाडांची दाक्षिणात्य लोकांवर टीका!
इयत्ता पाचवी व आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर, ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस! शिवसेनेवर दबावाचा प्रयत्न होत असल्याची चर्चा; समाजिक न्यायमंत्री म्हणाले....
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. यासह शिवसेनेच्या (शिंदे) का खासदारालाही नोटीस आल्याचं सांगितलं जात आहे. या माध्यमातून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,शिवसेनेवर दबवा टाकण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणता येणार नाही. आयकर विभाग त्यांच्या पद्धतीने काम करत असतो. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. त्यांना हवी ती माहिती देऊ. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात. त्यांना एखादी तक्रार आली, त्यांना काही वाटलं तर अशा प्रकरणांमध्ये तपास करण्याचा त्यांना अधिकार असतो.
"मुंबईत मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजेत", अशी मागणी शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडली. "मराठी माणसाला घरं नाकारणाऱ्या बिल्डरांविरोधात कारवाईसाठी सरकार कायदा करणार का?" असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मत्री शंभूराज देसाई म्हणाले,
"तुमचं मराठी माणसावर प्रेम नाही. हे पुतनामावशीचं प्रेम आहे. तुम्ही काही केलं नाही, मराठी माणसासाठी काही करू शकला नाहीत. हे सगळं रेकॉर्डवर येतंय."
यावर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर देसाई म्हणाले, "माझं उत्तर तरी ऐका. आम्ही काय करत होतो ते सांगू का? यावर विरोधकांमधून कोणीतरी म्हणालं तुमची गद्दारी सांगा. त्यानंतर मंत्री देसाई यांचा पारा चढला.
शंभूराज देसाई म्हणाले, "काय गद्दारी सांगतो? गद्दार काय म्हणतो? गद्दार कोणाला म्हणतो? बाहेर ये तुला दाखवतो. च्या*** गद्दार कोणाला म्हणतो रे?
यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कमकाज १० मिनिटांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली. तसेच देसाई यांचं वक्तव्य रेकॉर्डमधून काढून टाकत असल्याची घोषणा केली.
"सत्तापक्ष मनमानी करणार का?" विधीमंडळात द्राक्षबागांचा मुद्द्याला विरोध करणाऱ्यांना माढ्याचे आमदार भिडले; भरपाईवरून गदारोळ
"राज व उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुका एकत्र लढाव्या ही लोकभावना", ठाकरे गटातील मोठ्या नेत्याचं वक्तव्य
माहीम स्थानकाजवळ ट्रेनचा ब्रेकफेल, पश्चिम रेल्वेवरील लोकल खोळंबल्या
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. माहीम रेल्वेस्थानकाजवळ एका ट्रेनचा ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या जागेवर उभ्या आहेत. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसला आहे.