Mumbai Updates: राज्यात एकीकडे अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीची चर्चा अजूनही रंगत असताना दुसरीकडे शरद पवारांनी आपण विरोधकांसोबतच असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोग आपलाही पक्ष फुटीर गटाला देईल, अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरूनही दावे-प्रतिदावे होत आहेत. तसेच, शरद पवारांचा फोटो अजित पवार गटाने वापरण्यावरून सध्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Live Today: शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे

18:35 (IST) 17 Aug 2023
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यातून मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव – अशोक चव्हाण

बेरोजगारीचा प्रश्‍न मोठा असूनही त्याकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरूवारी सांगलीत म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

18:23 (IST) 17 Aug 2023
डोंबिवलीतील टिळकनगर शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षणाचे धडे

डोंबिवली: येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शंकर महादेवन ॲकेडमीतर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

सविस्तर वाचा...

17:53 (IST) 17 Aug 2023
प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रुग्णालयात परत येण्यास टाळाटाळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यात प्रतिनियुक्तीवर असलेल्या तीन डॉक्टरांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुन्हा रुग्णालयात बोलविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 17 Aug 2023
तुम्ही दिव्यांग श्रेणीत आहात? तलाठी व्हायचंय? मग हमीपत्र…

बुलढाणा : राज्यभरात होणाऱ्या तलाठी पदाच्या भरतीत दिव्यांग उमेदवारांना ‘हमीपत्र’ द्यावे लागणार आहे. हे लिखित पत्र दिल्यावरच पात्र दिव्यांग उमेदवारांना विविध सुविधा मिळणार आहेत.

सविस्तर वाचा...

17:21 (IST) 17 Aug 2023
रोहित पवारांचा तलाठी भरती पेपर फुटल्याच्या चर्चेवरून सरकारवर हल्लाबोल

तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग गंभीर झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!

https://twitter.com/RRPSpeaks/status/1692131036266951136

17:19 (IST) 17 Aug 2023
बीडमध्ये जयंत पाटलांची शायरी, शरद पवारांची दिलखुलास दाद! म्हणाले, “मी शायरी करणारा…!”

जयंत पाटील म्हणतात, “स्वभावाच्या विरोधी काही केलं की शरद पवार अशी प्रतिक्रिया देतात!”

वाचा सविस्तर

16:47 (IST) 17 Aug 2023
भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून युवकाला मारहाण

गावात जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून मध्यरात्रीला घराबाहेर बोलावून एका ४५ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: शरद पवारांचा मोदींना टोला

पंतप्रधान लाल किल्ल्यावरून म्हणाले मी पुन्हा येईन. माझी त्यांना विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. तेही म्हणाले होते मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं आहे की मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्या. फडणवीस पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून नाही, खालच्या पदावर. आता पंतप्रधान म्हणाले मी पुन्हा येईन. मग आज आहे त्याच्या खालच्या कुठल्या पदावर यायचंय, याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका - शरद पवार

https://twitter.com/ANI/status/1692138970719867093

16:41 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed:

माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं. तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं तर जा. पण ज्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा. पण ते नाही केलं, लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. भाजपाचा पराभव केला. त्यांचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज भाजपाच्या दावणीला बसायची भूमिका तुम्ही मांडत आहात. उद्या मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल, तेव्हा कोणतं बटण दाखवायचं आणि तुम्हाला कुठे पाठवायचं हा विचार मतदार केल्याशिवाय राहणार नाही - शरद पवार

16:37 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: शरद पवारांचं मोदींवर टीकास्र

पंतप्रधानांनी मणिपूरला जाणं गरजेचं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही - शरद पवार

16:22 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: जयंत पाटलांची शेरोशायरी...

नफरतों का असर देखो, जानवरों का बटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया,

ये पेड, ये पत्ते, ये शाखें परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए...

16:06 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: जयंत पाटलांनी आपल्याआधी रोहित पवारांना भाषण करण्याची संधी दिली...

जयंत पाटलांनी आपल्याआधी रोहित पवारांना भाषण करण्याची संधी दिली...

16:06 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed:

शरद पवारांना फक्त आश्वासित करायचंय. ते ज्या महाराष्ट्र धर्मासाठी लढतायत, अस्मितेसाठी लढतायत.. युवा वर्गाला मला आवाहन करायचं. शरद पवार या वयातही आपल्या अस्मितेसाठी लढत आहेत. एका बाजूला सत्ता आहे आणि एका बाजूला विचार आहे. आम्ही सर्वजण विचारांबरोबर राहिलो आहोत. संघर्ष करावा लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे. आपण बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत. उद्या कदाचित आमच्यावर कारवाई केली जाईल. पण विचारांसाठी आम्ही कुणालाही घाबरणार नाही असा शब्द देतो - रोहित पवार

16:02 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: अनिल देशमुखांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान!

मी १४ महिने तुरुंगाचा भत्ता खाऊन बाहेर आलोय. आता कुणी माई का लाल मला मैदानात उतरण्यापासून रोखू शकत नाही - अनिल देशमुख

15:57 (IST) 17 Aug 2023
सना खान हत्याकांडात म. प्र. भाजपा नेत्याचा हात, आई मेहरुनिसा खानचा आरोप

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याकांडात मध्यप्रदेशातील एका भाजपा नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप सना खान यांच्या आई मेहरुनिसा खान यांनी प्रसार माध्यमांसमोर केला.

सविस्तर वाचा...

15:55 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: ज्यांच्याकडे आशीर्वाद मागता, त्यांनाच... - अनिल देशमुख

जे लोक शरद पवारांकडून आशीर्वाद मागत आहेत, तेच लोक त्यांना घरी बसवण्यासाठी कट-कारस्थान करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांना केली. पण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांनाच हटवण्याचं कारस्थान तुम्ही केलं - अनिल देशमुख

15:54 (IST) 17 Aug 2023
मुंबई :अमलीपदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत टोळीला गुन्हे शाखेने मुलुंड परिसरातून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून आरोपींकडून एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सविस्तर वाचा…

15:46 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: त्या पोस्टरवाल्या पळपुट्याला समजू द्या - जितेंद्र आव्हाड

प्रत्येकानं हात उंचावून त्या पोस्टरवाल्या पळपुट्याला समजू द्या, बीडकर कुणाबरोबर आहेत - जितेंद्र आव्हाड

15:45 (IST) 17 Aug 2023
सना खान हत्याकांडात म. प्र. भाजपा नेत्याचा हात, आई मेहरुनिसा खानचा आरोप

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याकांडात मध्यप्रदेशातील एका भाजपा नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप सना खान यांच्या आई मेहरुनिसा खान यांनी प्रसार माध्यमांसमोर केला.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: ही अवस्था हिटलरच्या फॅसिझमपेक्षा कमी नाहीये - जितेंद्र आव्हाड

आता सगळ्यात मोठा बॉम्ब पडणार आहे. आत्तापर्यंत १४ दिवसांची कोठडी मिळत होती. आता कायदा आणला जात आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल असो वा नसो, तुम्हाला पोलीस फक्त संशयाच्या आधारावर ९० दिवस तुरुंगात ठेवू शकतात. जगभरात ४८ दिवसांपेक्षा जास्त कुणाला ताब्यात ठेवता येत नाही. पण इथे ९० दिवसांचा कायदा आणला जातोय. ही अवस्था हिटलरच्या फॅसिझमपेक्षा कमी नाहीये - जितेंद्र आव्हाड

15:37 (IST) 17 Aug 2023
Sharad Pawar in Beed: सत्ता येते, जाते, पण बाप बदलायचे नसतात - जितेंद्र आव्हाड

कुणावरही टीका करायची नाहीये. जे गेले ते गेले. पण आज मी सांगतो, विचारधारा कधीही बदलत नसते. पुरोगामी महाराष्ट्र शरद पवारांच्या खांद्यावर आहे. सत्ता आली काय, गेली काय, शरद पवारांना काही फरक पडत नाही. ८० ते ८६ शरद पवार सत्तेत नव्हते. सत्ता येते-जाते. पण विचारधारा बदलायची नसते. बाप बदलायचे नसतात - जितेंद्र आव्हाड

15:16 (IST) 17 Aug 2023
"कधीकधी कलावंतांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही, कारण...", शिंदे-फडणवीसांसमोर अजित पवारांचं वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कलावंतांच्या वाईट परिस्थितीवर भाष्य केलं. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा...

सविस्तर वाचा...

14:33 (IST) 17 Aug 2023
नागपूर : उड्डाणपुलाच्या पाडकामातून निघाला २२ हजार मेट्रिक टन मलबा

नागपूर : नागपूरमधील रेल्वे स्थानक मार्गावरील गणेश टेकडी उड्डाणपूल पाडकाम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. पुलाचा शेवटचा ४७ वा खांब तोडण्यात आला. आत्तापर्यंतच्या पुलाच्या पाडकामातून २२ हजार मेट्रिक टन मलबा निघाला असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 17 Aug 2023
गडचिरोली जवानांकडून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी- ६० पथकातील २०० जवान व डीआरजीच्या ७० कमांडोंनी मिळून अभियान राबविले होते.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 17 Aug 2023
रविकांत तुपकरांनी शिस्त पालन समितीसमोर जाण्याचे टाळले, राजू शेट्टींना पत्राद्वारे कळविल्या व्यथा

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या शिस्तपालन समितीसमक्ष उपस्थित राहण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांनी समिती अध्यक्षा सह सर्वोच्च नेते राजू शेट्टी यांना लिखित स्वरुपात आपली भूमिका, व्यथा व आक्षेप मांडले आहेत.

सविस्तर वाचा...

13:57 (IST) 17 Aug 2023
"महामानवांबद्दल कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये, याबद्दलची..."; शिंदे-फडणवीसांसमोर अजित पवारांचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडले. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी केली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला. ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 17 Aug 2023
Maharashtra News Update: संताजी-धनाजींसारखे यांना मी आणि दोन उपमुख्यमंत्री दिसतो - एकनाथ शिंदे

रोज सकाळी उठल्यावर साईबाबांकडे आपण प्रार्थना करतो की जनतेला सेवा मिळायला हवी. त्यासाठी आम्हाला बळ द्या. पण विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या. आधी म्हणाले सरकार पडेल. पण तसं म्हणता म्हणता त्यांचे ज्योतिषी संपले. पण तसं म्हणता म्हणता अजित पवारही इकडे आले. आता सरकार मजबूत झालंय. जनतेचा आशीर्वाद सरकारच्या पाठिशी असेपर्यंत सरकारचं केसही वाकडं होऊ शकत नाही. कितीही स्वप्नं पाहिली तरी फरक पडणार नाही. स्वप्नं दिवसा पाहू द्या, रात्री पाहू द्या, कधीही पाहू द्या. पण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. या शेतकऱ्याच्या मुलाला आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल? तुम्हाला उठता-झोपता फक्त एकनाथ शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसतात. इतिहासात संताजी-धनाजी दिसायचे, तसे. पण कितीही केलं, तरी एक लक्षात ठेवा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते - एकनाथ शिंदे

13:44 (IST) 17 Aug 2023
यापुढे बेकायदा इमारतींना महारेरा नोंदणी मिळणे कठीण! सीसी, ओसीची खात्री केल्यानंतरच नोंदणी

वसई-विरार महापालिका परिसरांत आढळलेल्या बेकायदा इमारतींनाही महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडून (महारेरा) प्रमाणपत्र बहाल करण्यात आल्याची बाब समोर आली असली तरी याआधीपासून महारेराने नोंदणीप्रक्रिया अधिक कडक केली आहे.

सविस्तर वाचा…

13:34 (IST) 17 Aug 2023
सोने खरेदीची सुवर्णसंधी… दरात घसरण, नागपुरात आजचे दर पहा

नागपूर: नागपूरसह देशभरात १९ जुलैला सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेटसाठी ६० हजार रुपयांवर गेले होते.

सविस्तर वाचा...

13:32 (IST) 17 Aug 2023
धक्कादायक! वन्यप्राण्यांच्या त्रासापोटी तीन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सविस्तर वाचा...

sharad pawar

शरद पवार

Mumbai Maharashtra Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व चिन्हावरून आता आयोगासमोर सुनावणी होणार?