Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. तसंच आमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. शिंदे फडणवीसांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. या आणि राज्यातल्या विविध घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
eknath shinde uddhav thackeray (4)
“मीच उद्धव ठाकरेंच्या मानेवरचा पट्टा…”, एकनाथ शिंदेंचा टोला; आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…
Piyush Goyal, north Mumbai lok sabha seat, BJP Stronghold, Piyush Goyal Challenges of Local Connect, Campaigning, bjp, Dahisar, Borivali, Kandivali, charkop, magathane,
मतदारसंघाचा आढावा – उत्तर मुंबई, पियूष गोयल यांच्यासमोर मोठे मताधिक्य टिकविण्याचे आव्हान
Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंच्या सेनेत चमच्यांना..”, ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदाराने शिंदे गटात जाताच व्यक्त केली खंत
marathi actress Kranti Redkar Wankhede tells the story behind the nicknames of the twin girls
Video: क्रांती रेडकरने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची सांगितली गोष्ट; एकीच्या नावाचा संबंध आहे झाशीच्या राणीशी तर दुसरीचा…
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, “मशालीच्या धगीने कमळ कोमेजणार, टरबुजाचं चिराट झालं”
prajwal revanna sexual scandal marathi news
लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच देवेगौडा यांच्या नातवाचे परदेशात पलायन
Mandar Chandwadkar reaction on gurucharan singh missing
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया
Live Updates

Marathi Breaking News Live| "सत्तेची हाव नाही तर शपथ का घेतली?" संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल; यासह महत्त्वाच्या घडामोडी

18:49 (IST) 28 Aug 2023
देशी सफरचंदही महागच मिळणार

नवी मुंबई: एपीएमसी बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद बाजारात दाखल होत असतात. जुलैअखेर देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते.

सविस्तर वाचा...

18:48 (IST) 28 Aug 2023
मध्य प्रदेशातून आलेल्या तरूणाला मेट्रो प्रवासात भोवळ आणि ….

नागपूर: मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेला एक तरूण मेट्रोतून प्रवास करीत असताना अचानक चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 28 Aug 2023
पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत अजितदादांचा 'वरचष्मा', पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण

पुणे पोलिसांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 28 Aug 2023
ठाण्यात रस्ते सफाईचे नवे नियोजन; दोन सत्रात होणार रस्ते सफाई, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा रंग बदलणार

ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत रस्ते नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर नागरि प्रकल्पांची कामे सुरू असतानाच, या उपक्रमांतर्गत आता शहरातील रस्ते सफाईचे नवे नियोजन पालिका प्रशासनाने आखले आहे. येत्या १ सप्टेंबरपासून या नियोजनाची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी रस्ते सफाईच्या कंत्राटातील अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा

17:06 (IST) 28 Aug 2023
विवाहित महिलेचा लग्नास नकार, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल...

अमरावती: एका विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अविवाहित तरुणाला तिने ऐनवेळी लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 28 Aug 2023
शिवसेनेच्या डोंबिवलीतील ‘मंगळगौर’ फलकाची जोरदार चर्चा

डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सर्वेश सभागृहाच्या कोपऱ्यावर शिवसेनेने मंगळागौर स्पर्धेचा फलक लावला आहे.

सविस्तर वाचा :

16:41 (IST) 28 Aug 2023
कल्याण: कथोरे समर्थकांना भाजप जिल्हाध्यक्ष मोहपे यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढल्याने नाराजी

कल्याण- ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे भिवंडीचे खासदार, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक कथोरे यांचे खच्चीकरण करण्यासाठी खासदार पाटील गटाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वाचा

16:10 (IST) 28 Aug 2023
शिंदे, पवार, भाजपाचे आमदार एकमेकांचे कपडे फाडतील – वडेट्टीवार

नागपूर : महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पण, आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या निधी वाटपावरून लाथाळ्या वाढतील. हे तिघेही एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 28 Aug 2023
''राज्यातील महायुतीत नवीन पक्ष नको..''; केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले...

नागपूर: राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्षासह इतर पक्ष अशा महायुतीची सरकार सत्तेवर आहे. नंतर अजित पवारही सरकारमध्ये आले. त्यामुळे येथे गर्दी वाढल्याने आता महायुतीत नवीन पक्षांना प्रवेश नको, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी वर्तवले.

सविस्तर वाचा

16:00 (IST) 28 Aug 2023
गोंदिया: धानाचे चुकारे रखडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा आमदारांच्या घरासमोर ठिय्या; जोपर्यंत खात्यात पैसे येणार नाही तोपर्यंत...

गोंदिया: गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज, सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सविस्तर वाचा...

15:54 (IST) 28 Aug 2023
“अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची अट…” वडेट्टीवार यांचा दावा

'बैल गाडी एकाची, बैल दुसऱ्याचा आणि हाकणारा तिसराच आहे', असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 28 Aug 2023
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना शेवटची मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 28 Aug 2023
"अजित पवारांच्या सभेला बळजबरीने लोक आणले", वडेट्टीवरा यांचे विधान; म्हणाले, " बेईमानी केली, पक्ष फोडला, हे.."

नागपूर : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे नाही, हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार काय? अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 28 Aug 2023
सेवानिवृत्तीनंतर मिळालेले ४० लाख शेअर बाजारात गुंतवले आणि ‘अशी’ गेली आयुष्यभराची कमाई

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 28 Aug 2023
पावसाची उसंत, चिंतेत वाढ, गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील जलसाठ्यांची काय आहे स्थिती?

नागपूर: श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने काही जोर पकडला नाही, पावसाने उसंत घेतल्याने त्याचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के घट झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 28 Aug 2023
लम्पी आजाराचा पुन्हा प्रादुर्भाव; शेतकरी – दुग्ध व्यावसायिक संकटात!

वाशिम: अत्यल्प पाऊस, पिकावर होत असलेला किडीचा प्रादुर्भाव त्यातच जिल्ह्यात लंपीचा आजार पुन्हा सक्रीय झाला आहे. परिणामी अनेक जनावरे दगावण्याची भीती असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सविस्तर वाचा...

15:34 (IST) 28 Aug 2023
जळगाव जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक अतितीव्र कुपोषित बालके

जळगाव: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यःस्थितीत एक हजार ८८९ अतितीव्र आणि सात हजार ३२६ सौम्य कुपोषित बालके असल्याची माहिती उघड झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:32 (IST) 28 Aug 2023
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; ‘या’ ४४ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, वाचा…

नागपूर: महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला आणखी गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने केली जात आहे. देशभरातील १३०९ स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली असून त्यात मध्य रेल्वेच्या एकूण ७६ स्थानकांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 28 Aug 2023
‘जनसंवाद यात्रे’चे अधिकृत पोस्टर रिलिज, पदाधिकाऱ्यांना लावता येणार स्वत:चा फोटो

वर्धा: काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद या गावापासून होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही यात्रा ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. पदयात्री जनतेच्या दारात जाऊन त्यांची भेट घेणार आहे.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 28 Aug 2023
शेगावात पन्नास हजारांवर भाविक! साप्ताहिक सुट्या व एकादशीचा योग; भाविकांमुळे विदर्भ पंढरी फुलली

बुलढाणा: साप्ताहिक सुट्या व एकादशीचा जुळून आलेला योग यामुळे विदर्भ पंढरीत सुमारे पन्नास हजार भाविकांची मांदियाळी जमली.

सविस्तर वाचा...

15:12 (IST) 28 Aug 2023
नवी मुंबई : आयसीएससीई इंग्रजी शाळेत ना.धों. महानोर यांच्या कवितांचा काव्यारंग रंगला

नवी मुंबई : इंग्रजी शाळेत ‘काव्यरंग’ च्या मंचावरून ज्येष्ठ कवि ना.धों. महानोर यांच्या कवितांचा बहर सजला होता. निमित्त होते महानोर यांच्या स्मृती दिनाचे. या काव्य स्पर्धेत तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केले. कोपरखैरणेतील नॉर्थ पॉईंट शाळेत मराठी कवितांची ही स्पर्धा पार पडली. 

सविस्तर वाचा..

15:11 (IST) 28 Aug 2023
खेलो इंडिया वुमन्स लिग पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्चस्‍व

पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे.

सविस्तर वाचा...

15:11 (IST) 28 Aug 2023
खारघरमधील उद्यानात बाक अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

पनवेल: खारघर वसाहतीमधील उद्याने जिवघेणी ठरत आहेत. तीन दिवसांपुर्वी रविवारी सायंकाळी खारघरमधील सेक्टर १२ येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेला उद्यानातील बाकाच्या दूरवस्थेमुळे प्राण गमवावे लागले. ऋक्षा प्रकाश विश्वकर्मा असे या बालिकेचे नाव आहे.

सविस्तर वाचा

15:10 (IST) 28 Aug 2023
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाकडून जाहीर

पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ३२.१३ टक्के, तर दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली.

सविस्तर वाचा

15:10 (IST) 28 Aug 2023
अत्याधुनिक स्वयंचलित कुलुपावर विश्वास ठेवणे पडले महागात, चोरांनी चौकट उचकटून केली घरफोडी

घरातील दागिने, लहान मुलांचे दागिने असा ९० हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 28 Aug 2023
नवी मुंबई: अल्पवयीन मुलावर मॉल मधील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार; आरोपी जेरबंद

नवी मुंबई : वाशीतील रघूलीला मॉल मधील स्वच्छतागृहात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याबाबत त्याने पालकांना सांगितल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सविस्तर वाचा

14:50 (IST) 28 Aug 2023
पुणे : गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत मेट्रो धावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक शहरात येतात. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 28 Aug 2023
दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा होणार सुरू

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

13:22 (IST) 28 Aug 2023
ठाण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळला भुजबळांचा पुतळा

बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 28 Aug 2023
गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठी हल्ला

परळ वर्कशॉप येथून निघालेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणूकीदरम्यान गणेशभक्तांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला जात असल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा

13:15 (IST) 28 Aug 2023
बुलढाणा : अतिवृष्टीचे तांडव; दीड लाख हेक्टरवरील खरीप पिकांची नासाडी; सव्वाचार हजार हेक्टर जमीन निकामी, १६१ कोटींची गरज

बुलढाणा : मागील जुलै महिन्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हानीची व्याप्ती इतकी भीषण होती की याचे सर्वेक्षण करायला महिना लागला! जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी नुकसानीचा हा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. शासनाकडे १६१ कोटींची मदत मागण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 28 Aug 2023
जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा पेटणार? राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पुस्तिकेत संकेत

नागपूर : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात संप पुकारला होता. शासनाने याबाबत समिती नेमून वेळ मारून नेली. मात्र अद्याप समितीचा निर्णय काही झाला नाही. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने अलीकडेच एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत आग्रह धरण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:42 (IST) 28 Aug 2023
पीएम स्वनिधी अंतर्गत २७ हजार पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणारे व ज्यांनी अद्यापपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व पथविक्रत्यांना (छोटे व्यवसायिक) या योजनेचा लाभ घेता येईल.

सविस्तर वाचा...

12:14 (IST) 28 Aug 2023
‘त्या’ शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही आणणारच – पालकमंत्री दादा भुसे यांचा निर्धार

या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखे राबविले जाते. तेथील शिक्षकांना ज्ञानदानाऐवजी राजकीय कामात जुंपले जात असल्याने शैक्षणिक दर्जा खालावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा सूर भुसे यांनी लावला.

सविस्तर वाचा...

12:04 (IST) 28 Aug 2023
हेल्मेट वापरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! गोंदिया जिल्ह्यात ५० दिवसांत ५ हजार दुचाकी चालकांवर कारवाई

गोंदिया : जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता पोलीस विभागाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. याअंतर्गत मागील ५० दिवसांत ५ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उगारताच वाहन चालकही आता हेल्मेटला प्राधान्य देत असल्याचे सुखद चित्र आहे.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 28 Aug 2023
चंद्रपूर : वेकोलि क्षेत्रात ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवा, हंसराज अहीर यांचे निर्देश

चंद्रपूर : चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामीण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असून यातून विविध टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांकडून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात टोळीयुद्ध, रक्तरंजित संघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान दिले.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 28 Aug 2023
अजित पवारांचा सावध पवित्रा, भुजबळांचा सारा रोख शरद पवारांवर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती, बीड व पिंपरी-चिंचवडमधील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात उघडपणे बोलण्याचे टाळून सावध पवित्रा घेतला तर छगन भुजबळ यांनी शरद पवार हे केवळ मराठेतर नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेतात, असा थेट हल्ला चढवून पवारांना लक्ष्य केले.

सविस्तर वाचा...

11:53 (IST) 28 Aug 2023
अकोला : काकाचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. मंगेश जानराव तायडे (२८, रा. रामगांव ता.व जि. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पीडितेचा चुलत काका आहे.

सविस्तर वाचा...

11:35 (IST) 28 Aug 2023
डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालय आणि या भागातील व्यापारी संकुलासमोर सकाळीपासून चारचाकी, दुचाकी वाहने दोन ते तीन रांगांमध्ये उभी केली जातात.

सविस्तर वाचा

11:22 (IST) 28 Aug 2023
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर-शहडोल नवीन रेल्वेगाडी; ‘या’ तारखेपासून तिकीट विक्री, जाणून घ्या सविस्तर…

नागपूर-शहडोल एक्स्प्रेस साप्ताहिक गाडीची नियमित सेवा ४ नोव्हेंबर पासून सुरु होईल. ११२०१ नागपूर-शहडोल एक्स्प्रेस नागपूरहून ११.४५ वाजता सुटेल. नागपूरहून दर सोमवारी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.२९ वाजता शहडोलला पोहोचेल.

सविस्तर वाचा

11:07 (IST) 28 Aug 2023
‘वाढदिवस आहे भावाचा, सत्कार आहे खड्डय़ांचा’; राज्य महामार्गावर अनोखे आंदोलन

भंडारा ते भंडारा रोड रेल्वेस्थानकापर्यंत दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गाने जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या मार्गावर दररोज अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 28 Aug 2023
Weather Updates: मान्सूनच्या परतीची तारीख ठरली; लहरीपणा मात्र कायम!

जून महिन्यात उशिराने आलेला मान्सून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली मोठी विश्रांती यामुळे पावसाचा तुटवडा अजूनही आहेच. तरीही आता मान्सूनच्या परतीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून राज्यात मान्सून परतणार आहे.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 28 Aug 2023
नागपूर : अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून

एका वाहनचालक युवकाशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास सांगितल्यानंतरही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११ वाजता वाडीत घडली. प्रणाली दहाट (३०,त्रिशरण चौक, वाडी) असे मृत महिलेचे तर ललीत रामदास डहाट (४५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा

11:05 (IST) 28 Aug 2023
नागपूर : प्रेयसीला मारहाण करणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून

अनैतिक संबंधामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मात्र, प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या प्रेमविरांची काही कमी नाही. अशाच प्रेमसंबंधातून एका प्रेमविराने प्रेयसीला मारहाण करणाऱ्या तिच्या पतीचा काटा काढला. प्रेयसीला मारहाण केल्यामुळे तिच्या पतीचे गुप्तांग ठेचून खून केला.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 28 Aug 2023
यवतमाळ : “मरणाने केली सुटका, जगण्याने…”, गँगरीन झालेल्या निराधार वृद्धेची कहाणी

कुणी आप्तस्वकीय नसल्याने तिला या केंद्रात आधार मिळेल हा विश्वास दाखल करणाऱ्या नागरिकांना होता. त्यांनी केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना तिची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्या वृद्घेच्या पायाला गँगरीन झाला होता. अशा अवस्थेत ती दिवस काढीत होती.

सविस्तर वाचा

sanjay raut on devendra fadnavis and eknath shinde

फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारामवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे.