Mumbai Maharashtra News Highlights: दहशदवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत हे हल्ले परतावून लावले आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर काल देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. या भाषणात नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना स्पष्ट भाषेत इशारा दिला आहे. पंतप्रधानांच्या या भाषणावर राज्यातूनही प्रतिक्रिया येत आहेत. यावर महायुतीतील नेते पंतप्रधानांच्या भाषणावर समाधन व्यक्त करत आहेत. तर, विरोधी पक्षातील काहींनी यावर टीका केली आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरही राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यासह राज्यातील विविध घडामोही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Maharashtra Breaking News Live Today 13 May 2025 : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स १३ मे २०२५.
आता भगवा फडकूनच थांबायाच : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विभागाची दहावी निकालात घसरण, राज्यात पाचवे स्थान
भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करा, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
सिडकोत पाण्यासाठी आंदोलन
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना : सामान्यांसाठी घरांच्या किमती कायम ठेवण्याचा म्हाडाकडून प्रस्ताव
गोदावरीच्या पात्रातील नैसर्गिक जांभूळबेटाची पर्यटकांना नव्याने साद !
India Pakistan Tension : एक वर्षाच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर, बीएसएफ जवान रेश्मा इंगळे म्हणाल्या, “देशासाठी…”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात शस्त्रविराम झाला असला तरीही जवळपास सगळ्याच सैनिकांना सुट्टीवरुन परत बोलवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातल्या अमरावती येथील अचलपूरच्या जवान रेश्मा इंगळे यांनाही सुट्टी रद्द करुन अमृतसरला बोलवण्यात आलं आहे. त्या एक वर्षाच्या त्यांच्या मुलाला घरी ठेवून सीमेवर गेल्या आहेत. मुलाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मात्र त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या कुटुंबाने आणि अचलपूरच्या लोकांनी कौतुक केलं आहे. त्यांचे पती भारत इंगळे यांनी आपण आता नोकरी सोडणार असून मुलाचा सांभाळ करु असं सांगितलं आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार
पुण्याच्या एपीएमसी मार्केटमधील सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले की, "आम्ही तुर्कीकडून सफरचंद खरेदी करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे कारण ते पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्याऐवजी आम्ही हिमाचल आणि इतर भागातील सफरचंद खरेदी करत आहोत. भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत असताना तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवले."
अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते: विजय वडेट्टीवार
भारत-पाकिस्तान संघर्षावर पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या भाषणाने लोकांचा आत्मविश्वास वाढला नाही. त्यांनी अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते, ते होताना दिसले नाही. मला ते आत्मविश्वासपूर्ण भाषण वाटले नाही."
पोलीस बोटीची समुद्रात सतत गस्त ;भारत - पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी पोलीस सुरक्षा वाढवली
वसई: पर्यटकांची हुल्लडबाजी नागरिकांच्या जिवावर, नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गिरीश महाजन यांच्याविरुद्धचे बदनामीकारक व्हिडिओ हटवण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने दोन युट्यूबर्सना महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध यूट्यूबवर अपलोड केलेले सहा व्हिडिओ "प्रथमदर्शनी बदनामीकारक" असल्याचे सांगत ते हटवण्याचे निर्देश दिले.
डोंबिवलीत कन्व्हेअन्स डीडच्या नावाखाली सोसायटी पदाधिकाऱ्यांची २४ लाखाची फसवणूक
येऊरमध्ये ५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
"मला खात्री आहे की...", संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीबाबत प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तान मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "मला वाटत नाही की काँग्रेस प्रश्न उपस्थित करत आहे, परंतु ते यावर विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याचा सल्ला देत आहेत. मला खात्री आहे की, आणखी एक सर्वपक्षीय बैठक होईल ज्यामध्ये सर्व पक्षांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा का केली हे सांगितले जाईल."
दरोडा टाकून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध परभणीत मकोका कायद्या अंतर्गत कारवाई
भारत-पाकिस्तान संघर्षावर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीबद्दल आपले मत व्यक्त करताना खासदार शरद पवार म्हणाले की, "हा एक संवेदनशील, गोपनीय मुद्दा आहे. पण जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा चर्चा होतात. काही गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत."
सावंतवाडी बस स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले; प्रवाशांना धूळ खात एसटी प्रतीक्षेचे भोग
Raj Thackeray: “मुंबई महानगरपालिकेबाबत…” राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांचे महत्त्वाचे विधान
Sharad Pawar: पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपल्या प्रकरणात हस्तक्षेप केला: शरद पवार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामावर घोषणा केल्याच्या मुद्द्यावर बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, "आतापर्यंत आपल्या देशाच्या अंतर्गत प्रकरणात तिसऱ्या देशाकडून कोणताही हस्तक्षेप झालेला नव्हता, पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपल्या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे."
Maharashtra Live Updates: पंतप्रधानांच्या भाषणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी असे म्हटले आहे की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जर चर्चा होणार असेल तर ती फक्त पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरवरच होईल."
“अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती,” भारत-पाकिस्तान प्रश्नी ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर रोहित पवारांची टीका
भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम आणि काश्मीर प्रश्नी अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
याबाबत एक्सवरील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की, "शस्त्रविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि शस्त्रविराम केला, हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे."
काल संध्याकाळी पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केले होते. या परिस्थितीत पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती. संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, परंतु अमेरिकेसारखा देश असली विधाने करत असताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र ट्रम्प यांच्या विधानाहून अधिक दुःखद आहे."
Mumbai-Pune News Live Today 13 May 2025 : महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी संदर्भातील घडामोडींचा आढावा...