Maharashtra Political News Updates, 12 December 2022 : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं ते म्हणाले. तसेच धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हा विषय दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

uddhav Thackeray Shiv Sena Leader, Manohar madhavi, Manohar madhavi Arrested for Extortion, Lok Sabha Elections 2024, manohar madhavi arrested, marathi news, manohar madhavi news, navi Mumbai, Manohar madhavi navi Mumbai, Manohar madhavi in extortion case,
उद्धव ठाकरेंना झटका! ऐन निवडणुकीच्या काळात मनोहर मढवींना खंडणी प्रकरणात अटक
maharashtra, decrease in death
राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Live Updates

Marathi Batmya Today, 12 December 2022 : अनिल देशमुखांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती

17:31 (IST) 12 Dec 2022
पुणे: महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक ‘ताम्रपट’कार रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजकार्य विभागात जीवनगौरव पुरस्काराऐवजी शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 12 Dec 2022
ठाणे: तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याच्या दिशेने राज्यकर्त्यांचा कारभार; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची राज्य सरकारवर टीका

शाई फेकप्रकरणाचे समर्थन होऊ शकत नाही पण, या गुन्ह्यात लावण्यात आलेले ३०७ कलमाचेहि समर्थन होऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. आपले विचार आणि लोकांसाठी आंदोलन करणे हे राजकीय जीवनाचा भाग असतो.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 12 Dec 2022
घरफोडी करण्यासाठी पुणे, मुंबई, नवी मुंबईत फिरणाऱ्या २ अट्टल आरोपींना अटक

मूळ उत्तरप्रदेशचे असलेले दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले. मात्र, त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कामवण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी केली यशस्वी झाली आणि मग घरफोडी करणे नित्याचेच झाले. घरफोडीसाठी ते पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते. मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात यश आले.  सौरभ देवशरण यादव (वय २४ वर्षे), तौफिक हावसी शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविस्तर बातमी

16:32 (IST) 12 Dec 2022
नवी मुंबई : स्लॅबचा भाग कोसळून बालकाचा मृत्यू

नवी मुंबईतील शिलोत्तर रायचूर ( सुकपूर) येथील नवीन वसाहतीमध्ये रविवारी नवजीवन गृहनिर्माण सोसायटीच्या तीन मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळल्याची घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सूरेश राजभर असे मृत मुलाचे नाव आहे.

सविस्तर बातमी

14:19 (IST) 12 Dec 2022
VIDEO: "दोन हजाराच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला, त्यामुळे आता...", भाजपा खासदाराची मोठी मागणी

भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, अशी मोठी मागणी केली आहे. भाजपातूनच आता दोन हजार रुपयांच्या नोटेवर आक्षेप घेतल्याने आणि रद्द करण्याची मागणी केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर आता मोदी सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सविस्तर बातमी...

14:19 (IST) 12 Dec 2022
"यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, कारण...", शाईफेक प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणावर भाष्य केलं. चंद्रकांत पाटलांवर झालेली शाईफेक चुकीचीच होती, पण शाईफेक करणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच हा गुन्हा दाखल करून समाजाला पेटवण्याचं काम केल्याचा आरोप केला. ते रविवारी (११ डिसेंबर) ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

14:07 (IST) 12 Dec 2022
नवी मुंबई : स्लॅबचा भाग कोसळून बालकाचा मृत्यू

शिलोत्तर रायचूर ( सुकपूर) येथील नवीन वसाहतीमध्ये नवजीवन गृहनिर्माण सोसायटीच्या तीन मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळल्याची घटना घडली रविवारी घडली आहे. स्लॅबच्य ढिगाऱ्याखाली अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सूरेश राजभर असे मृत मुलाचे नाव आहे.

सविस्तर बातमी

13:35 (IST) 12 Dec 2022
समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होताच गेला पहिला बळी, महामार्गावर वाहनाच्या धडकेत…

समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठीच्या उपशमन योजनांवर पुन्हा प्रश्नचिद्ध निर्माण झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच या महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गावरील उपशमन योजना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी

13:10 (IST) 12 Dec 2022
‘…तेव्हा तलवारीला धार कशी द्यायचे हे माहिती आहे का?”, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी सुनावलं

राजकारणात संयम महत्त्वाचा असतो असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरुन आलं होतं. तसंच आपण आज मौन का बाळगलं होतं याचा खुलासा करत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांवर टीका केली.

सविस्तर बातमी

13:01 (IST) 12 Dec 2022
'छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते, त्यांनी…'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असे पटोले म्हणाले. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नानांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी

12:28 (IST) 12 Dec 2022
डोंबिवली: काँक्रीटीकरण कामासाठी मानपाडा रस्त्यावरील सागाव साईबाबा चौकातून शिळफाटाकडे जाणारा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी बंद

डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावरील सागाव मधील साईबाबा चौक ते बुधाजी चौक (शिळफाटा पोहच रस्ता) रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सागाव मधील साईबाबा चौक ते बुधाजी चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन कोळसेवाडी वाहतूक विभागाने केले आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 12 Dec 2022
आधी फडणवीस, नंतर शिंदे, त्यानंतर शिवसेनाप्रमुख….; समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनादरम्यान लावलेल्या कटआऊटसची चर्चा

बहुचर्चित नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने शिंदे- फडणवीस सरकारने मोठा ‘ इव्हेंट’ साजरा केला. ठिकठिकाणी भगवे झंडे, पताका, स्वागत फलक, कटाऊटस लावून वातावरण निर्मिर्ती करण्यात आली. यातील काही कटाऊटस नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

सविस्तर बातम्या

12:25 (IST) 12 Dec 2022
नंदुरबार: कुपोषण, बालमृत्यूवरील मुदतबाह्य औषधसाठा उघड्यावर - कारवाई न झाल्याने आश्चर्य

जिल्ह्यात एकिकडे कुपोषण, बालमृत्यू यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना दुसरीकडे याच आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या मुदतबाह्य झालेला मोठा औषधसाठा थेट उघड्यावर आढळून आला.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 12 Dec 2022
नागपूर : खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा लाठीमार; काही युवक जखमी

नागपूरमध्ये खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक मोहित चव्हाण यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या क्रार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी तिकीट मिळाले नसल्यामुळे अनेकांना परत जावे लागले. सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे बाहेर काही काळ गोंधळ झाला. प्रवेशद्वाराच्या बाहेर गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात चार-पाच युवक जखमी झाले.

सविस्तर बातमी

12:24 (IST) 12 Dec 2022
ठाणे : सात तासानंतर वाहतूक कोंडी सुटली

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर मध्यरात्री उलटला होता. अखेर सात तासांनंतर म्हणजेच सकाळी १०.३० सुमारास ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सुटली. परंतु या कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

सविस्तर वाचा...

12:23 (IST) 12 Dec 2022
नागपूर: पंतप्रधानांनी हिरवी झेंडी दाखवताच मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावर आनंदी आनंद

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. खापरी मेट्रो स्थानकावर पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने सेंट्रल एव्हेन्यू व कामठी मार्गावरील प्रवासी सेवेला हिरवी झेंडी दाखवली.

सविस्तर बातम्या

12:22 (IST) 12 Dec 2022
मुंबईतील अंधेरी आणि मालाडमधून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; गेल्या चौदा वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे उघड

अंधेरी आणि मालाडच्या परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अब्दुल आजाद अब्दुल हाय फारुख ऊर्फ आबिद आणि आसिफ नूरइस्लाम खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहे. यातील आसिफ हा गेल्या चौदा वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

सविस्तर बातमी

12:02 (IST) 12 Dec 2022
मुख्यमंत्र्यांचे शहर एका रस्ते अपघाताने झाले ठप्प; पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागत आहे पाऊण तास

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर मध्यरात्री उलटला. टॅंकरमधील तेल रस्त्यावर सांडल्याने सोमवारी सकाळपासून ठाणे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. घोडबंदर मार्गावर कापूरबावडी ते मानपाडा, मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते माजीवडा आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर माजीवडा ते कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, शाळेच्या बसगाड्या वाहतूक अडकून होत्या.

सविस्तर बातमी

11:31 (IST) 12 Dec 2022
पुणे: करोनाच्या महामारीतही मलेरियाचे सावट कायम; जगभरात वर्षाला सहा लाखांवर मलेरिया रुग्णांचा मृत्यू

करोना महासाथीच्या काळात बहुतांश विषाणूजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे दिसून आले. मात्र, मलेरिया या कीटकजन्य आजाराचे प्रमाण करोना महामारी धोक्याच्या सर्वोच्च पातळीवर असतानाही नियमित राहिल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक मलेरिया अहवालातून समोर आले आहे.

सविस्तर वाचा

11:30 (IST) 12 Dec 2022
पुणे: तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली. पुणे शहरातही पावसाचा शिडकावा झाला.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 12 Dec 2022
पुणे: शहरात आज पुन्हा रिक्षा बंद

दुचाकी टॅक्सीच्या विरोधात शहरात सोमवारी (१२ डिसेंबर) पुन्हा रिक्षा बंद करण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीकडून हा बंद पुकारण्यात आला आहे.शहरात सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबरला बंद पुकारला होता.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 12 Dec 2022
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी…,” वरिष्ठ काँग्रेस नेत्याचं सभेत धक्कादायक विधान

केंद्रातील काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर कुरघोडी सुरु असते. यादरम्यान अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जातात. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांना मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा असा सल्लाच देऊन टाकला.

सविस्तर बातमी

11:17 (IST) 12 Dec 2022
पंकजा मुंडे आज अर्धा तासासाठी बाळगणार मौन, पण नेमकं कारण काय?

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे मौन बाळगणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

11:16 (IST) 12 Dec 2022
“ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही, खरी शिवसेना ही…”; निवडणूक आयोगापुढील सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं ते म्हणाले. तसेच ‘धनुष्यबाण’ निशाणी आणि ‘शिवसेना’ हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा

कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. मात्र, सीबीआयच्या भूमिकेनंतर या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.