डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावरील सागाव मधील साईबाबा चौक ते बुधाजी चौक (शिळफाटा पोहच रस्ता) रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सागाव मधील साईबाबा चौक ते बुधाजी चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन कोळसेवाडी वाहतूक विभागाने केले आहे. रस्ते बंदची अधिकृत अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. जाहीरसूचना, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वी हा रस्ता बंद केला जाणार आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांचे शहर एका रस्ते अपघाताने झाले ठप्प; पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागत आहे पाऊण तास

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

येत्या तीन दिवसात रस्ता बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली. डोंबिवलीतील साईबाबा चौक ते बुधाजी चौक दीड किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची डागडुजी झाली नाही. त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. दररोज दोन ते तीन अपघात होत आहेत. या रस्ते कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २७ कोटीचा निधी मंजूर केला आहे.

खड्ड्यांमुळे या रस्त्यावर सकाळपासून ते रात्री पर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. या खड्ड्यांना कंटाळून अनेक वाहन चालक एमआयडीसी पेंढरकर महाविद्यालय मार्गे डोंबिवलीत वळसा घेऊन प्रवेश करतात. या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे म्हणून आ. प्रमोद पाटील, सागावचे शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी प्रकाश म्हात्रे गेल्या वर्षापासून शासनाकडे प्रयत्नशील आहेत. गेल्या वर्षी या कामासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पार पडून कामाचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आहेत. एका वर्चस्ववादी लोकप्रतिनिधीच्या इशाऱ्यावरुन डोंबिवलीतील सर्व कामे हाती घेण्यात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, नेते खड्डे पडुनही या महत्वपूर्ण विषयावर शांत राहणे पसंत करतात.

हेही वाचा >>>डोंबिवलीत औषध पुरवठादाराचा खून

कल्याण लोकसभेचा मी खासदार आहे. मी कोणत्याही रस्त्यांची जबाबदारी झटकत नाही, असे विधान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी चार महिन्यापूर्वी डोंबिवलीत करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला होता. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील काही रस्ते हे विविध शासकीय यंत्रणांच्या अखत्यारित आहेत. डोंबिवलीतील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए, एमएसआरडीसी या यंत्रणांच्या अखत्यारित आहेत. शहरी रस्ते पालिकेच्या नियंत्रणाखाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते मोजके आहेत. प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले म्हणून ती जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची नाही. रस्ते मंत्री म्हणून प्रत्येक रस्ते काम करण्याची आपणास मुभा नाही, असे विधान मंत्री चव्हाण यांनी केले होते. त्याला खा. शिंदे यांनी टोला लगावला होता. सागाव ते बुधाजी चौक रस्त्यासाठी खा. शिंदे यांनी निधी मंजूर आणल्याने या कामात मंत्री चव्हाण ढवळाढवळ करत नाहीत, असे समजते.

प्रवेश बंद
सागाव साईबाबा चौक येथून देसलेपाडा कमान, डी मार्ट ते शिळफाटा रस्त्यावरील बुधाजी चौकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत इगो लेडीज बारवरील छाप्यात ५३ जणांवर गुन्हा; पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरुन बाजारपेठ पोलिसांची कारवाई

पर्यायी रस्ता
पी. ॲन्ड टी. काॅलनी, नांदिवली पंचानंद, स्वामी समर्थ मठ, नांदिवली टेकडी भागातील प्रवाशांनी सागाव साईबाबा चौक डाव्या बाजुस वळण घेऊन सोनरापाडा रस्ता-टेम्पो चौक-पिंपळेश्वर मंदिर-पिंपळेश्वर हाॅटेल येथून डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे.कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ भागातून येणारे वाहन चालक पिंपळेश्वर हाॅटेल येथे उजवे वळण घेऊन टेम्पो चौक-साईबाबा चौकातून इच्छित स्थळी जातील.

” साईबाबा चौक ते बुधाजी चौकापर्यंतच्या रस्ते कामासाठी खोदाई सुरुवात होण्यापूर्वी हा रस्ता बांधकाम विभागाच्या आदेशा प्रमाणे बंद केला जाईल. येत्या तीन दिवसात याविषयी निर्णर्य घेतला जाईल.”-रवींद्र क्षीरसागर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी, वाहतूक