Maharashtra, Mumbai Breaking News Updates : ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले तो भाग सर्वासाठी प्रतिबंधित करा, असे आदेश सोमवारी येथील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. न्यायालयीन आदेशानुसार या मशिदीचे चित्रीकरण सर्वेक्षण सोमवारी करण्यात आले. तर वाराणसीतील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान बाजीराव रस्त्यावरील एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले आहेत. सविस्तर बातमी
मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सुरू असताना दोन भाजपा नगरसेविका आपसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या होत्या. सविस्तर बातमी
ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. अधिक वाचा…
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यात बेशिस्त वाहनचालकांना ई चलानद्वारे दंड पाठवण्यात आला होता. पण दंडात्मक रक्कम वाहन मालकांकडून वाहतूक विभागाकडे भरली जात नव्हती. वारंवार समज देऊनही या रकमा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, कोळसेवाडी वाहतूक विभागात अस्वस्थता होती. त्यानंतर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये थकबाकीदार वाहन मालकांना हजर राहण्याचे आदेश देऊन वाहतूक विभागाने ७ हजार १६१ वाहन मालकांकडून ३४ लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर बातमी
अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. यावरुनही आता मनसेवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसाच्या पुणे दौर्यावर येत आहे. आम्ही २१ ते २७ मे दरम्यान सभेच पुण्यात नियोजन करीत आहे. नेमकी सभा कुठे होणार,त्याबाबत राज ठाकरे उद्या जाहीर करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.
“यांना भोंग्यांवर, जातीवर, धर्मावर बोलायचं असतं. भारताच्या नागरिकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका या पाचही देशांचं धर्मव्यवस्थेमुळे, जातीवादामुळे, समूहवादामुळे काय वाटोळं झालं आहे. त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक”, असं आव्हाड म्हणाले.
मनेस प्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवनागी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला हरकत नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. वाचा सविस्तर…
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेनं केली आहे. मनसेचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घ्या येथे क्लिक करुन
“गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असं ट्वीट रोहीत पवारांनी केलं आहे.
Photos: माईंची खरी कमाई… सिंधुताईंनी संभाळलेल्या त्या ९ मुलींच्या लग्नाला ३००० पाहुण्यांची हजेरी
'अनाथांची माय' पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा रविवारी दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे थाटात पार पडला. माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून तीन हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी हजेरी लावली.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. वाचा सविस्तर…
“हे जे काही चाललं आहे, ते मनोरंजन म्हणून पाहा. ते फार गांभीर्याने घेऊ नका. भोंगा काढला काय, राहिला काय, तुमचं पोट भरणार नाहीये”, अशी टिप्पणी एकनाथ खडसेंनी केली आहे.
फडणवीस यांनी रविवारी मुंबईत घेतलेल्या सभेमधून शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधताना त्यांची तुलना थेट विभीषणाशी केली आहे. शिवसेनेच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या येथे क्लिक करुन
तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले तो भाग सर्वासाठी प्रतिबंधित करा, असे आदेश सोमवारी वाराणसीमधील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. आज या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. मात्र ज्या कायद्याच्या आधारे याचिका करण्यात आलीय तो कायदाच वादात सापडलाय.
देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेवरुन शिवसेनेनं भाजपा आणि विरोधी पक्ष नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय.
मुंबई-आग्रा महामार्गवर धुळ्यातील मित्रनगर भागाक काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजर कारवर आदळली. हा अपक्षात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षा आणि क्रूजर कारचा अक्षरश: चुराडा झाला.
अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. वाचा सविस्तर…
केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. वाचा सविस्तर…
वर्षभरापूर्वी करोनाकाळात केवळ रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजू लागले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या पुस्तक प्रकाशनात मनसे व भाजपच्या राजकारणावर फटकेबाजी केली. वाचा सविस्तर…
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.