राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

दरम्यान, रविवारी ( ४ सप्टेबर ) रोजी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर, आज ( ५ सप्टेंबर ) मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट सांगितला आहे.

‘या’ जिल्ह्यांना इशारा

६ सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया

७ सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड

8 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली

९ सप्टेंबर : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa
First published on: 05-09-2022 at 17:00 IST