चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी झाली. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या चार गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात दोघे अडकले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘एसडीआरएफ’चे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले आहे. मुंदखेडा, वाकडी येथील जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यात सोमवारी (३० ऑगस्ट) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे छोटे-मोठे बंधारे, पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या प्रकल्पांंतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यःस्थितीत जामदा बंधार्‍यातून १५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
bhandara lok sabha seat, Voters Boycott, Lok Sabha Elections in Bhandara, Tribal Village, Polling Station Removal, bhandara polling news, bhandara Voters Boycott Elections, lok sabha 2024, election 2024, bhandara news,
भंडारा : ‘या’ गावातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण…
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

ढगफुटीमुळे गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

गोताळा डोंगर भागात ढगफुटी झाली. ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. वाघडू गावातही पाणी शिरले. पावसाची संततधार कायम राहिल्याने मंगळवारी (३१ ऑगस्ट) पहाटे तीन ते चारच्या सुमारास वालझरी नदीला मोठा पूर आला. पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. वाघडूसह वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव जावळे या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून, जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

कजगावसह वीस गावांचा संपर्क तुटला

चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्री ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तितूर नदीला महापूर आला आहे. नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे वीस गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून, नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कथडे वाहून गेले. वीजखांबही उन्मळून पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. कजगावला पाण्याचा वेढा पडला असून, त्यामुळे जुने गाव ते नवे गावातील वाहतूक व ग्रामस्थांचा एकमेकांचा संपर्क तुटला आहे. खाजोळा, भोरटेक, पिंप्री, वडगाव येथील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रथमच एवढा महापूर तितूर नदीला आल्यामुळे सकाळपासून बघ्यांची गर्दी झाली होती.तितूर नदीला प्रथमच पाणी आल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील ट्रान्स्फॉर्मर पाण्यात असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

हेही वाचा – राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस!; हवामान विभागाचा इशारा

बोरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पाचे मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी पाच दरवाजे ०.१५ मीटरने उघडण्यात आले आहेत. बोरी प्रकल्पाची जलपातळी २६७.११ मीटर झाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता प्रकल्पाचे पाच दरवाजे ०.१५ मीटरने उघडून २२५५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

कन्नड घाटात दरड कोसळली

रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. औरंगाबाद- धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात रुतल्या आहेत. रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. घाट भागात मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे कामात अडचण येत आहे. या मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद – चाळीसगाव मार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे जाण्यासाठी पर्यायी घारगाव रस्ता वापरावा, तर औरंगाबादहून येण्यासाठी अजिंठा-जळगाव महामार्ग वापरावा, असे चाळीसगाव येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक भागवत पाटील यांनी सांगितले.

मन्याड प्रकल्पाचा साठा शंभर टक्के

पावसामुळे मंगळवारी (३१ ऑगस्ट) मन्याड मध्यम प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के झाला असून, धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदीला सुमारे ५००० क्युसेक्सपर्यंत पूर जात आहे. त्यामुळे मन्याड व गिरणा या नद्यांच्या काठालगतच्या गावांतील ग्रामस्थांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे-ढोरे नदीपात्रात उतरवू नयेत. जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जळगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व चाळीसगाव येथील पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

हेही वाचा – मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास पाऊस तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार कोसळणार

पुराची धोक्याची सूचना

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व (गिरणा धरण वगळता) इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यःस्थितीत आता जामदा बंधार्‍यातून १५०० क्सुसेस पाणी जात आहे. गिरणा नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भडगाव व पाचोरा या तालुक्यांतील गिरणा नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सखल नदीकाठावरील गुरेढोरे, इतर सामान, चारा तसेच रहिवासदेखील तातडीने उंच जागी हलवावे व सावधानता बाळगावी. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे, असे चाळीसगाव येथील गिरणा पाटबंधारे उपविभागातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंदखेडा, वाकडीतून जनावरे वाहून गेली

चाळीसगाव शहरातून जाणार्‍या डोंगरी व तितूर या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे अर्धे चाळीसगाव शहर पाण्याखाली आले आहे. सकाळी लवकर हे पाणी आल्याने चाळीसगावकर साखरझोपेतच होते. यामुळे अद्याप नुकसानीचा अंदाज आलेला नाही. नदीपात्र उथळ झाल्याने शहरात पाणी शिरले, तसेच मुंदखेडा शिवारातून दोनशे गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चाळीसगाव तालुका परिसरात अनेक गावंमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचे थैमान सुरू झाले. यात मुंदखेडा, वाकडी, रोकड़े, पानगाव, बोरखेड़ी या गावांना पुराचा वेढा आहे. यातील वाकडी गावातून दोन ट्रॅक्टर व दोनशे गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.