राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५८९ जणांनी करोनावर मात केली. तर, ३ हजार १५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ५८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राज्याती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९५.७ टक्क्यांवर पोहचले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत १,३९,५७,४६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १९ लाख ९७ हजार ९९२ (१४.३१ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ३२५ जण गृहविलगीकरणात असून, २ हजार २३० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पुणे शहरात दिवसभरात ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले असून, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहारातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ७८७ वर पोहचली आहे. तर ४ हजार ७२० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ३५३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ७६ हजार ८१२ जण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, स्तनदा माता, गर्भवती महिला व ताप असलेल्या व्यक्ती यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये, असा सल्लावजा इशारा भारत बायोटेक या कंपनीने दिला आहे. कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादेतील या कंपनीने तयार केली असून तिला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांआधीच मान्यता देण्यात आली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 3015 new covid19 cases 4589 discharges and 59 deaths today msr
First published on: 20-01-2021 at 21:46 IST