महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा चाचणी कक्षाच्या वतीने २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. एमबीएसाठीची प्रवेश परीक्षा १० आणि ११ मार्च रोजी तर १० मे रोजी अभियांत्रिकी शाखेसाठी परीक्षा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येते. २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १० आणि ११ मार्च रोजी सीईटी पार पडेल. तर एमसीएसाठी २४ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. बीई, बीटेक, बॅचलर इन फार्मसीसाठी १० मेरोजी सीईटी होणार आहे. तर बॅचलर इन फाइन आर्ट्ससाठी १३ मेरोजी, मास्टर्स आर्किटेक्चरसाठी आणि मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी २० मे रोजी सीईटी होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state cet 2018 tentative schedule declared be btech mba mca bpharm cet
First published on: 01-01-2018 at 16:18 IST