विधानसभा निवडणुकीचा शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ‘लाखो लोकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मी विचारपूर्वक वचनं दिली आहेत. तसेच राजाच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.’ “सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे,” असं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी, विज बिल कपात अशा अनेक घोषणांचा पाऊस शिवसेनेच्या वचननाम्यात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वचननाम्यातील दहा आश्वासनं-

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshtra vidhansabha election 2019 shivsena vachanma nck
First published on: 12-10-2019 at 10:39 IST