संगमनेर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन तीन बैठका झाल्या असून १२५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांसाठी गणेशोत्सवानंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. १८० पेक्षा जास्त जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- “हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेली पक्ष फूट किंवा कुटुंबातील फूट ही राज्यातील जनतेला आवडली नसून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय महायुतीला आला आहे.