विधिमंडळात मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप, त्यांची भूमिका आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी लावण्यात आल्या. एवढे पैसे कोठून आले. मनोज जरांगे हे खासदार शरद पवार यांच्या संपर्कात होते. आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर बैठका झाल्या, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केलाय. या आरोपांनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. यावरच आता खुद्द मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. ते संभाजीनगरात आज (२७ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

“फडणवीसांसाठी मी एक काटा आहे”

मनोज जरांगे म्हणाले की, माझ्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली. मी गरीब मराठ्यांचे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तेचा वापर करत आहेत. त्यांनी काय करायचं ते करू द्या. कारण माझा कोठेही दोष नाही. मी मागेच मराठा समाजाला सांगितलं की फडणवीसांसाठी मी एक काटा आहे. सरकार आणण्यासाठी मला त्यांना गुंतवायचे आहे.

anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”
Sharad Pawar
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

मी कोठेच गुंतू शकत नाही, मला कोणाचाही पाठिंबा नाही

“मी कोठेही जायला तयार आहे. अरे तुम्ही कोणतीही चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मी भेकड असतो तर गप्प बसलो असतो. मी कोठेच गुंतू शकत नाही. मला कोणाचाही पाठिंबा नाही. मला कोणीही पैसे दिलेले नाहीत. मला कोणीही फोन केलेला नाही. तुम्ही एसआयटी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील. त्यांनी मला अनेकवेळा कॉल केलेले आहेत. मग मी पण ते कॉल बाहेर काढतो. होऊन जाऊ द्या मग. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. माझ्यासाठी जात हे दैवत आहे. मला तुम्ही आता बोलावलं तरी मी सलाईन हातात घेऊन चौकशीसाठी येईल,” अशी भूमिका जरांगे यांनी घेतली.

मराठा समाज एवढा कमजोर आहे का?

“मला माहिती आहे मी निर्दोष आहे. माझ्याविरोधात काहीच सापडू शकत नाही. मला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नाही. माझ्या स्वागतासाठी मराठा समाजाने जेसीबी लावलेल्या आहेत. मराठा समाज एवढा कमजोर आहे का? कष्ट करतो. त्यामुळे काहीही अडचण नाही,” असंदेखील विधान जरांगे यांनी केलं.

गिरीश महाजन यांचे नाव घेत मोठा दावा

“एसआयटी चौकशी करणार असाल तर सर्व चौकशी करा. पोलिसांचीही चौकशी केली पाहिजे. अगोदर हल्ला कोणी केला, हेही तपासा. हल्ल्याचा आदेश देणाऱ्या मंत्र्यांचीही चौकशी करा. गिरीश महाजन यांनी कॉल केला होता. ती रेकॉर्डिंग बाहेर काढा मग. गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील,” असा दावा जरांगे यांनी केला.