अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीये. दोघांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्र सोडलं जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मनोज जरांगेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वैयक्तिक वाद सुरू झाला आहे. दोघांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका केली जात आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Shyam Manav on Devendra Fadnavis
Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार
Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
Sharad Pawar, Sharad Pawar news,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी; अमित शहांनी केली होती जहरी टीका
sanjay raut replied to amit shah
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
ashok chavan keep bjp away from program on birth anniversary of shankarao chavan
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!

उमरखेड येथील सभेतून मराठा समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात मनोज जरांगे म्हणाले, “विरोध करणाऱ्यांचा तुम्ही ताण घेऊ नका. त्यांना मी एकटाच खंबीर आहे. एकदा आरक्षण मिळू द्या, त्याचा (छगन भुजबळ) कार्यक्रमच वाजवतो. इतक्या उच्च दर्जाचा मंत्री, एक पुढारी साध्या साध्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळतंय तर तो आडवा येतोय. याच्यासारखा कलंकित मंत्री या राज्यात दुसरा असूच शकत नाही.”

हेही वाचा- “जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत”, अजित पवार गटाच्या नेत्याची बोचरी टीका

सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे, अशी सूचक वक्तव्यं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.