scorecardresearch

Premium

“देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमच्या डोक्यात विषारी…”

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचं सध्या राजकीय नेत्यांबरोबर द्वंद्व सुरू आहे. यावरून त्यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Manoj Jarange patil on Devendra Fadnavis
मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुरू झालेला असताना आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला आहे.

छगन भुजबळांनी काल (१० डिसेंबर) इंदापूर येथील ओबीसी एल्गार सभा गाजवली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी तुफान शब्दफेक केली. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, छगन भुजबळ कुठेही बरळतात. आम्ही त्यांना किंमत देत नाही. त्यांना उत्तर द्यायचं नाही. जरा शहाणा माणूस असेल उत्तर देता येतं. ते कामातून गेले आहेत. त्यांनी लवकरच गोळ्या घेतल्या म्हणजे बरं.

What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
mahesh gaikwad slams bjp mla ganpat gaikwad
आमदार गणपत गायकवाड भाजपचे असते तर एवढे निर्घृण वागले नसते, शहरप्रमुख महेश गायकवाड यांची टीका
A huge crowd of citizens outside Karuna Hospital after the ghosalkar firing incident
मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध? पूर्ववैमनस्यातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार
Rupali Chakankar sanjay gaikwad
मराठा आरक्षणावरून शिंदे-अजित पवार गटात जुंपली, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर चाकणकरांचं चोख प्रत्युत्तर!

हेही वाचा >> “२४ डिसेंबरनंतर पश्चाताप…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; म्हणाले, “फडणवीसांना पुन्हा उघडे…”

पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी (छगन भुजबळांना) सांगितलं असेल की बोल म्हणून. कारण, लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय. हे फडणवीसांनीच सुरू करायला लावलं आहे. ते त्यांच्या जवळचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात.

“मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात, मराठा बघतोय. तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांत कलह लावू नका”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil on devendra fadnavis over maratha reservation sgk

First published on: 10-12-2023 at 12:51 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×