लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यामुळे लोकसेवक होण्याची प्रबळ इच्छाशक्ती अनेकांमध्ये जागी झाली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या वाटय़ाला सुटलेल्या एकमेव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल डझनहून अधिक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. आमदार होण्यासाठी गुढघ्याला बािशग बांधलेल्यांमध्ये मटका बुकी चालविणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला, याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूरचा उल्लेख केल्याशिवाय उस्मानाबादची ओळख पूर्ण होत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिचा आशीर्वाद घेऊनच अनेक पक्ष आपल्या प्रचाराला सुरुवात करतात. तुळजापुरातूनच निवडणुकीचा रणसंग्राम पेटला जातो, त्या तुळजापूरमध्ये भाजपकडून आमदार होण्यासाठी एक-दोन नव्हे, तब्बल १४जण इच्छुक आहेत. पक्षप्रमुखांकडे अनेकांनी तगादा लावला आहे. उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यास विद्यमान आमदार तथा परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांचे पानिपत आपणच करू शकतो, असा दावा यातील अनेक इच्छुक छातीठोकपणे करीत आहेत.
तुळजापूर शहर वगळता पालकमंत्री चव्हाण यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. तुळजापूर शहरात मात्र त्यांना कधीच मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने उचल खाल्ली आहे. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता सोबत घेऊन भाजपत प्रवेश करतो, उमेदवारी द्या, अशी विनवणी थेट मुंबईपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर या नेत्याने मुलाखत दिल्याचीही सध्या तुळजापुरात जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीवर ‘दृष्टी’ ठेवून ‘मुक्काम पोस्ट मुंबई’ असा पत्ता असलेले एक उद्योजकही मोठय़ा उत्साहाने मतदारसंघात सध्या फेरफटका मारत आहेत. यालाच त्यांनी जनसंपर्क अभियान असे नाव दिले आहे. आमदारकीवर दृष्टी ठेवून जनसंपर्क अभियान राबविणाऱ्या व नुकताच भाजप प्रवेश केलेल्या या उद्योजकाला भाजप कितपत स्वीकारणार, अशी उघड चर्चा तालुक्यात भाजपचे जुने कार्यकत्रे करीत आहेत.
उस्मानाबाद तालुक्यात भाजपचे जुने कार्यकत्रे नंतर राष्ट्रवादीमय झाले. तेथे कोंडमारा झाल्यामुळे काँग्रेसमध्ये गेले. आता पुन्हा वर्तुळ पूर्ण करीत भाजपत जाण्याच्या तयारीत असलेले स्वयंघोषित नेतेही इच्छुकाच्या रांगेत ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय िनबाळकर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि. प. सदस्य रामदास कोळगे, अनिल काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय िशगाडे, डॉ. गोिवद कोकाटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा पलवान, सत्यवान सुरवसे हेही इच्छुक आहेत. शेकापचे ज्येष्ठ नेतेही भाजप उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या सर्वानी पक्ष निरीक्षक एकनाथ पवार व स्मिता वाघ यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
तुळजापूरला भाजपकडे डझनाहून अधिक इच्छूक
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यामुळे लोकसेवक होण्याची प्रबळ इच्छाशक्ती अनेकांमध्ये जागी झाली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या वाटय़ाला सुटलेल्या एकमेव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल डझनहून अधिक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
First published on: 09-08-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many interested in bjp for assembly election