रत्नागिरी :  वंचित बहुजन आघाडीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्याच्या निषेधार्थ  १२ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता गुढे फाटा ते बहाद्दूर  शेख नाका चिपळूण येथून डिवायएसपी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयीची माहिती वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. नरवण (ता. गुहागर) येथील अण्णा जाधव यांच्यावर हल्ला करणा-यांवर व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत

चिपळूण तालुक्यातील फणसवाडी येथे २६ ऑक्टोबरला रात्री गावकर प्रकाश सोनू घाणेकर यांच्या रहात्या घरी लक्ष्मण कोकमकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशावरुन त्या चारगाव विभागाच्या लोकांना उपस्थित रहाण्याची जबाबदारी कोकमकर यांच्यावर दिली होती. त्यावेळी आमदारांनी कोण कोण आले आहेत त्यावर कोकमकर यांनी आजू- बाजूच्या गावांची नावे सांगितले. त्यावेळी आमदारांनी बौद्धवाडीतील लोक आले आहेत का असे विचारले असता दोन लोक बौद्धवाडीतील आले आहेत. विद्यमान आमदार त्यावेळी म्हणाले की, त्यांना काही माहित नाही का? त्यावर कोकमकर यांनी सर्वांना सांगितले असल्याचा म्हटले. मात्र विद्यमान आमदार म्हणाले की, त्या काळी एक प्रथा होती. असे कुणी वरटे त्यांच्याकडे वर्दी दिली की, लोक जमायचे. मग त्याच पद्धतीने पहिले महार होते त्यांनी वर्दी दिली की सगळे जमायचे. ते पहिले महार आता ते बुद्धिष्ठ झाले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यमान आमदार यांनी महार शब्दाचा उल्लेख केला. या निषेधार्थ आता  माफीनामा नको तर त्यांच्यावर घटनेच्या कलमानुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा असे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबर अण्णा जाधव यांच्या भ्याड हल्ला झाल्यानंतर आज तागायत पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र पोलिसांना अद्यापही हल्ले खोर सापडलेले नाहीत.  त्यावेळी आमदारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्याचा राग मनात धरुन हे कृत्य केले असल्याचा ठाम विश्वास यावेळी अण्णा जाधव यांनी व्यक्त केला. मात्र शासनाकडून मनाई आदेश आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, त्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार सुरु आहे. जरी मनाई आदेश असला तरी देखील हा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.